शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

सभापतिपदासाठी सात उमेदवार

By admin | Updated: June 27, 2014 00:09 IST

सभापतिपदासाठी सात उमेदवार

 

नाशिक : महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी सात उमेदवारांनी एकूण १५ अर्ज दाखल केले आहेत. सेना, मनसे, भाजपा, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, सभापतिपदासाठी मनसेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मनसे-भाजपाचे संख्याबळ सात असले, तरी यंदा सेनेनेदेखील सभापतिपदासाठीच्या हालचाली गतिमान केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मनसेकडून राहुल ढिकले, शिवसेनेकडून वंदना बिरारी, सचिन मराठे, कॉँग्रेसकडून शिवाजी गांगुर्डे आणि राहुल दिवे, राष्ट्रवादीकडून राजेंद्र महाले, तर भाजपाकडून रंजना भानसी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखले केले. या सात उमेदवारांनी एकूण १५ अर्ज दाखल केले आहेत. येत्या सोमवारी (दि.३०) स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. यापूर्वी कॉँग्रेस आणि मनसेच्या वाट्याला सभापतिपद आल्याने आता कराराप्रमाणे सेनेकडून सभापतिपदावर हक्क सांगितला जात आहे, तर दुसरीकडे भाजपानेदेखील मनसे आणि सेनेच्या बळावर सभापतिपद खेचून आणण्यासाठी व्यूहरचना चालविली असल्याचे वृत्त आहे. यासाठी मुंबईतच पक्षश्रेष्ठींच्या पातळीवरून तोडगा काढण्यासाठी भाजपा आशावादी असून, सेनेची भूमिकाही यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सेना, भाजपाला सभापतिपदाची अपेक्षा असली, तरी इकडे मनसेने पुन्हा एकदा सभापतिपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे लक्ष असल्याने मनसेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत मनसेचाच सभापती व्हावा यासाठी भाजपाचेही मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे वृत्त आहे. यासाठीची मनधरणी सुरू असली, तरी भाजपाने मात्र अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचेही समजते. (प्रतिनिधी)