शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग २८ मध्ये चार जागांवर सेनेचे आठ उमेदवार

By admin | Updated: February 4, 2017 01:27 IST

शिवसेनेचा प्रताप : दोन्ही गटांना वाटले एबी फॉर्म

नरेंद्र दंडगव्हाळ  सिडकोमहापालिका निवडणुकीत शिवसेनेत उमेदवारी वाटपातच मोठ्या प्रमाणावर गटबाजी उफाळून आली असून, सिडकोतील एकाच प्रभागात चार जागांसाठी चक्क आठ उमेदवारांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देण्याचा प्रताप शिवसेनेने केला आहे. मात्र, दोन्ही गटांकडून समोरच्यांकडील उमेदवारांच्या एबी फॉर्मकडे संशयाने पाहिले जाऊ लागले असून, आपण सादर केलेला एबी फॉर्मच अधिकृत असल्याचा दावा केला आहे. महापालिका निवडणुकीत १२२ जागांसाठी ८५० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेकडे मुलाखती दिल्याने त्याच वेळी प्रत्यक्ष उमेदवारी वाटपात अघटित घडण्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अवधी संपला तरी सेनेने अधिकृत उमेदवारांची यादी घोषित न केल्याने संभ्रम व संशयाला पुष्टी मिळाली. उमेदवारी देताना एबी फॉर्म वाटपात मोठ्या प्रमाणावर घोळ झाला. त्यातून सिडको विभागात सेनेचा वेगळाच प्रताप समोर आला आहे. एकाच प्रभागात चार जागांसाठी चक्क आठ उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. प्रभाग २८ मध्ये सेनेचे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, मनसेतून सेनेत प्रवेश केलेल्या सुवर्णा मटाले व शीतल भामरे या एका गटाने स्वतंत्रपणे येऊन सेनेच्या अधिकृत एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचबरोबर याच प्रभागात स्वीकृत नगरसेवक माणिक सोनवणे, रेणुका गायधनी व सोनाली काकडे यांनीही एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात माणिक सोनवणे यांच्यासोबत गटाने सर्वात अगोदर एबी फॉर्मसह अर्ज दाखल केल्याचे समजते. प्रभाग २९ मध्ये मनसेतून सेनेत प्रवेश केलेल्या रत्नमाला राणे, माजी नगरसेवक सुमन सोनवणे, सतीश खैरनार व मनसेतून सेनेत गेलेले नगरसेवक अरविंद शेळके या एका गटाने एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला, तर याच प्रभागातून सेनेकडून अधिकृत एबी फॉर्मसह विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे सुपुत्र दीपक बडगुजर, भूषण देवरे, माधुरी खैरनार व सुमन सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या प्रभागात चार जागांसाठी आठ उमेदवारांनी सेनेकडून अधिकृत एबी फॉर्म जमा केले आहेत. त्यात बडगुजर गटाने सर्वांत आधी एबी फॉर्म दिल्याचे सांगितले जाते. आता नेमका कोणत्या गटाचा एबी फॉर्म खरा याची पडताळणी निवडणूक अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. या प्रकाराने सेनेतील गटबाजी उफाळून आली असून, त्याचे पडसाद प्रत्यक्ष निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.