शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सात शाखांना मंजुरी

By admin | Updated: March 28, 2017 01:32 IST

नाशिक : सिडकोत दी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बॅँक लि.च्या प्रादेशिक कार्यालयात बॅँकेची शाखा सुरू करण्यात आली

सुखदेवे : राज्य बॅँकेच्या नाशिक शाखेचा शुभारंभनाशिक : रिझर्व्ह बॅँकेचे बदललेले धोरण व स्पर्धेमुळे राज्य सहकारी बॅँकेच्या ठेवींमध्येही घट झाली असून, बॅँकिंग क्षेत्रातील चढ उतार लक्षात घेता, राज्य सहकारी बॅँकेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी चाळीस वर्षांनंतर बॅँकेच्या सात शाखांना रिझर्व्ह बॅँकेने मंजुरी दिली असून, नाशिकमध्ये सुरू झालेल्या बॅँकेच्या शाखेतून बदलत्या काळानुसार ग्राहकांना सर्व सुविधा देण्यात येतील, अशी माहिती राज्य सहकारी बॅँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी दिली.  सिडकोत दी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बॅँक लि.च्या प्रादेशिक कार्यालयात बॅँकेची शाखा सुरू करण्यात आली. त्याचा शुभारंभ डॉ. सुखदेवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल अहिरे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, विश्वास बॅँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आला त्यावेळी डॉ. सुखदेवे बोलत होते. ते पुढे म्हणाले, १०६ वर्षांची परंपरा असलेल्या राज्य सहकारी बॅँकेत २५ हजार कोटींच्या ठेवी होत्या, या ठेवींच्या माध्यमातून राज्य बॅँकेने राज्यातील सहकार चळवळीत मोठे योगदान दिले. साखर कारखाने, सूत गिरण्या, ग्रामीण बॅँका व सहकारी बॅँकांना राज्य बॅँकेने पत पुरवठा केला, त्याचबरोबर ठेवीही स्वीकारल्या. परंतु मधल्या काळात बदललेले नियम व धोरणामुळे राज्य बॅँकेच्या ठेवी थेट नऊ हजार कोटींवर पोहोचल्या. चढ-उतार सुरू असते, आता साडेपंधरा हजार कोटींच्या ठेवी झाल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, आमदार सीमा हिरे, डॉ. राहुल अहिरे, विश्वास ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ठाणे जिल्हा बॅँकेने शंभर कोटींच्या ठेवी राज्य बॅँकेत ठेवल्याने त्यांना ठेव पावतीचे वितरण करण्यात आले तसेच रायगड बॅँकेने ५० कोटी ठेवले. त्याचबरोबर गृह व वाहन कर्जाचे धनादेशही डॉ. सुखदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)