शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारींचा महिनाभरात निपटारा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:31 IST

सरकारी कामात भ्रष्टाचार झाल्यापासून ते पोटचा मुलगा त्रास देत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांकडून झाला. नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींचा महिनाभरात निपटारा करण्याचे आदेश जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. येथील नियोजन भवनात सकाळी ११ वाजता गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : सरकारी कामात भ्रष्टाचार झाल्यापासून ते पोटचा मुलगा त्रास देत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांकडून झाला. नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींचा महिनाभरात निपटारा करण्याचे आदेश जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.येथील नियोजन भवनात सकाळी ११ वाजता गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, आमदार अनिल कदम, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, जि. प. बांधकाम सभापती मनीषा पवार, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अनिल लांडगे, उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदी उपस्थित होते. यापुढे दर दोन महिन्यांनी अशाप्रकारे जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. पहिल्या सत्रात ग्रामीण भागातील तालुकानिहाय तक्रारींचे निराकरण करण्यात आले. नाशिक, निफाड, दिंडोरी, पेठ या क्रमानुसार तालुकानिहाय नागरिकांनी उपस्थित केलेल्या तक्रारींचे वाचन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर व उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले. सर्वाधिक तक्रारी या निफाड तालुक्यातील होत्या. जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, अमृता पवार, मंदाकिनी बनकर यांनी त्यांच्या गटातील विकासकामे मंजूर करण्याबाबत पत्र दिले होते. अशोक आवारे, सुशीला पाटील, शिवाजी कोठुळे, साहेबराव निरगुडे, सोमनाथ पगारे यांनी वैयक्तिक अडचणी व समस्या मांडल्या, तर नारायण शिंदे यांनी निफाड साखर कारखाना सुरू करावा, यासाठी शेतकºयांची मागणी असल्याचे सांगितले. त्यावर याबाबत तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. शिवरस्ते मंजूर होत नसल्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्यानंतर आमदार अनिल कदम यांनी याबाबत एकत्रित बैठक घेऊन शिवरस्त्यांचा प्रश्न निकाली काढावयास हवा, अशी सूचना केली. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी याबाबत एकत्रित बैठक घेण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. शारदा शेलार व सिंधूताई कदम यांनी पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळण्याची मागणी केली. त्यांना आठ दिवसांत यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रे पाहून लाभ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले. नाशिक, दिंडोरी, पेठ तालुक्यांतूनही अनेक तक्रारींचा पाऊस पडला.भ्रष्टाचार : भाजपा तालुकाध्यक्षाची तक्रार पेठ भाजपा तालुकाध्यक्ष भरत कामडी यांनी पेठ तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याचे पुरावेच आपण सादर केले असल्याचे सांगितले. पेठ नाशिक रस्त्याचे काम सुरू असताना दहा अपघात होऊन चार जणांचे बळी गेले आहेत. संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्याकडून मुख्यसेविका ४० टक्के पोषण आहाराचे कमिशन खाते, त्याचेही आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगितले. यासर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करून १५ दिवसांत जिल्हाधिकाºयांकडे अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. दिंडोरीला विमान कारखानाच्तुकाराम जोेंधळे यांनी दिंडोरी तालुक्यातील बहुतांश जमिनींचे अधिग्रहण औद्योगिक विकास महामंडळाने केले आहे. एचएएलसारखा एखादा मोठा प्रकल्प दिंडोरीत आणल्यास जिल्हावासीय आपले नाव कायमचे लक्षात ठेवतील, असे सांगितले. त्यावर महाराष्टÑ औद्योेगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिंडोरीत भूसंपादन सुरू झाले आहे. स्वीडन येथील फायटर प्लेन बनविण्याच्या एका कंपनीने दिंडोरीत विमान कारखाना सुरू करण्याबाबत उत्सुकता दाखविली आहे. त्याबाबत सोमवारी(दि.३०) नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. गिरीश महाजन यांनीही जिल्ह्णात मोठे उद्योग येण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.