शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला सव्वाशे मंडळांत देवीची स्थापना

By admin | Updated: October 2, 2016 00:46 IST

नवरात्रोत्सव : वाजत-गाजत घटस्थापना; सार्वजनिक मंडळांच्या वतीने विविध उपक्रम

नाशिकरोड : परिसरातील घराघरांत व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी शनिवारी मोठ्या भक्तिभावाने वाजत-गाजत घट व देवीच्या मूर्तीची स्थापना केली. नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास १२५ हून अधिक छोट्या-मोठ्या सार्वजनिक मंडळांनी देवीची स्थापना केली आहे.नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी सकाळपासून घट व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी देवळालीगाव, शिवाजी पुतळा, भाजीबाजार, जेलरोड इंगळेनगर येथे मोठी गर्दी केली होती. सकाळनंतर मुहूर्त बघून घरोघरी विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. तसेच नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लहान-मोठ्या १२५ हून अधिक मंडळांनी नवरात्र सण साजरा करण्याची परवानगी घेतली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्री देवीच्या मूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्थापना केली. सर्वज्ञ फाउंडेशन, सुभाषरोड सांस्कृतिक मित्रमंडळ, छत्रपती मित्रमंडळ, शिवशाही प्रतिष्ठान, श्री सप्तशृंगी कला व सांस्कृतिक मित्रमंडळ, सप्तशृंगी मित्रमंडळ एकलहरे, शिवाजीनगर मित्रमंडळ, धनंजय सोशल ग्रुप सामनगावरोड, वैष्णवी सोशल फाउंडेशन, मॉडेल कॉलनी वसंतविहार मित्रमंडळ, जय बजरंग मित्रमंडळ, संग्राम कला-क्रीडा मंडळ, एकता मित्रमंडळ, आझाद मित्रमंडळ एकलहरा, वज्रेश्वरी मित्रमंडळ, कुरण मित्रमंडळ, किरण शिव मित्रमंडळ, चेहेडी श्रद्धापार्क सांस्कृतिक मित्रमंडळ, जेलरोड आदिंसह अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी देवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. नाशिकरोडची ग्रामदैवत असलेल्या श्री दुर्गा देवी मंदिरात प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे यांच्या हस्ते पूजा करून घटस्थापना करण्यात आली. देवळालीगाव श्री रेणुकामाता मंदिर, सुभाषरोड, जगताप मळा श्री सप्तशृंगीमाता मंदिर, देवी चौक, टिळकपथ श्री संतोषीमाता मंदिर, जयभवानी रोड, जेलरोड श्री दुर्गादेवी मंदिर आदि ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने पूजा करून घटाची स्थापना करण्यात आली. नवरात्रीनिमित्त देवी मंदिरांमध्ये मंडप उभारून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दुपारनंतर देवी मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)