शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्याच्या ठिकाणी मोफत डायलेसीस केंद्र साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:08 IST

राज्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्णांकरिता दहा हजार खाटा राखीव आहेत. त्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असून, गरजू रु ग्णांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोफत डायलेसिस केंद्र धर्मादाय संस्थेच्या मदतीने लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सन्मान सोहळ्यात बोलताना केली.

नाशिक : राज्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्णांकरिता दहा हजार खाटा राखीव आहेत. त्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असून, गरजू रु ग्णांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोफत डायलेसिस केंद्र धर्मादाय संस्थेच्या मदतीने लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सन्मान सोहळ्यात बोलताना केली.  सामुदायिक विवाह सोहळा समिती या धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून ९६ वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा चोपडा लॉन्समध्ये पार पडला. या सोहळ्याचे उत्कृष्ट संयोजन केल्याबद्दल समिती सदस्यांचा सन्मान सोहळा धर्मादाय आयुक्त कार्यालय, नाशिकच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डिगे बोलत होते. आत्महत्याग्रस्त व कर्जबाजारी शेतकरी, भूमिहीन नागरिक आणि गोरगरीब कुटुंबीयांतील वधू-वरांकरिता संपूर्ण महाराष्ट्रात सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करून ३०४६ विवाह लावण्यात आले आणि त्या माध्यमातून धर्मादाय संस्था गोरगरीब माणसांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे भविष्यात लग्न कसे होणार या चिंतेने होणाऱ्या आत्महत्या थांबू शकतील, असा विश्वास शिवकुमार डिगे यांनी व्यक्त केला.कार्यक्र माचे प्रास्ताविक धर्मादाय सह आयुक्त प्रदीप घुगे यांनी केले. डिगे यांचा सत्कार क. का. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी धर्मादाय उपायुक्त कांचनगंगा सुपाते-जाधव, समिती सदस्य केशवराव पाटील, श्रीकांत बेणी, सुनील चोपडा, अ‍ॅड. सुरेखा जोशी, अजयकांत मंडावेवाला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सहायक धर्मादाय आयुक्त के. एम. सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन सहायक धर्मादाय आयुक्त वैशाली पंडित यांनी केले.समिती सदस्यांचा गौरवयावेळी सामुदायिक विवाह सोहळा समितीचे सदस्य केशवराव पाटील, श्रीकांत बेणी, अ‍ॅड. सुरेखा जोशी, सुनील चोपडा, प्रवीण जोशी, हेमलता बिडकर, प्रवीणचंद्र देसाई, राजीव जाधव, अजयकांत मंडावेवाला, डॉ. रावसाहेब शिंदे, अ‍ॅड. शशिकांत पवार, सुदर्शन दहातोंडे, डॉ. प्रभाकर वडजे, आनंद महाले, डॉ. दौलतराव महाले, अ‍ॅड. भाऊसाहेब गंभिरे यांचा डिगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल