शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा  महामार्गावरील सर्व्हिसरोड अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:07 IST

मुंबई-आग्रा महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे उलटूनही कोणार्कनगर ते के. के. वाघ कॉलेज, मीनाताई ठाकरे स्टेडियम ते के. के. वाघ सर्व्हिस रोडवर पथदीप बसवण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. या समस्येकडे स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका प्रशासन यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे उलटूनही कोणार्कनगर ते के. के. वाघ कॉलेज, मीनाताई ठाकरे स्टेडियम ते के. के. वाघ सर्व्हिस रोडवर पथदीप बसवण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. या समस्येकडे स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका प्रशासन यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा व स्थानिकांचा प्रवास सोयीचा व्हावा, या हेतूने महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिसरोड करण्यात आले. या सर्व्हिसरोडच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची आहे. महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्ष झाले आहे पण अजूनही कोणार्कनगर, जत्रा हॉटेल, हनुमाननगर, अमृतधाम, के. के. वाघ कॉलेज व मीनाताई ठाकरे स्टेडियम ते के. के. वाघ या परिसरातील सर्व्हिस रोडवर पथदीप बसविले नाहीत. त्यामुळे हा परिसर रात्रीच्या वेळी अंधारात असल्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय कॉलनी रोडच्या वळणावर सर्व्हिस रोडने अंधारातून येणारी वाहने दिसत नाही त्यामुळेदेखील अपघात घडतात.तरी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या परिसरात पथदीप बसवण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.अंधारामुळे रात्रीच्या वेळी महिला, लहान मुले, वयोवृद्ध यांना अचानक वाहनाचे फोकस डोळ्यावर चमकल्यामुळे तारांबळ उडते परिणामी अपघात होतात. शिवाय या परिसरात शाळा, कॉलेजेस व दाट लोकवस्तीचा भाग असल्याने मोठी वर्दळ असते. अचानक कॉलनी रोडकडून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होतात. अंधाराचा फायदा घेत सोनसाखळी चोरी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दमदाटी यांसारख्या घटना रोज घडतात. शिवाय आता एस.टी. बसदेखील सर्व्हिस रोडवर वाहतूक करतात त्यामुळे रात्रीच्या वेळी बस स्टॉपवर उभे असलेले प्रवासी दिसत नाही त्यामुळे बस थांबत नाही. प्रवाशांनादेखील अडचणीचा सामना करावा लागतो.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा