नांदगाव : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे जगनाथ साळुंके यांचे नामदेव महाराज यांच्या जीवनावरील प्रवचन झाले. दिशा व गौरी सोनवणे, श्रावणी बोरसे यांनी नामदेव महाराज यांच्या जीवनावर माहिती दिली. दरम्यान समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना समाजातर्फे बक्षीस वाटप करण्यात आले. सिद्धी बागुल व शामल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. पंकज सोनवणे यांनी समाजाला नामदेव महाराजांची प्रतिमा भेट दिली. सूत्रसंचालन गणेश बागुल यांनी केले.यावेळी रमाकांत सोनवणे, रघुनाथ तरटे, किशोर तल्हार, पंकज सोनवणे, योगेश तरटे, सुहास पुणतांबेकर, रवींद्र खैरनार, अमित सोनवणे, सुनील निकुंभ, सुहास सोनवणे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
नांदगावला प्रवचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 18:21 IST