शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डंपर-टेम्पोच्या अपघातात एक गंभीर

By admin | Updated: July 17, 2016 00:50 IST

उड्डाणपुलावरील घटना : दरवाजा तोडून वाचविले प्राण

 नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील इनायत कॅफेसमोरील उड्डाणपुलावर बंद पडलेल्या डंपरवर टेम्पो आदळून झालेल्या अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़ १६) रात्रीच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे टेम्पोत अडकलेल्या चालकास अग्निशमन दलाने दरवाजा तोडून बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले़ दरम्यान या चालकास उपचारासाठी आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे़ मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साडेसात वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिकला येणारा श्रीनाथ अर्थमुव्हर्सचा डंपर (एमएच १२, एचडी ४९१३) हा इनायत कॅफेसमोरील उड्डाणपुलावर बंद पडला़ त्यावेळी पाठीमागून आलेल्या कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या रिकाम्या टेम्पोने या डंपरला धडक दिल्याने तिची काच तुटली़ मात्र, संबंधित टेम्पोचालक तिथून गेला़ यानंतर आलेल्या कोंबड्यांची वाहतूक करणारा दुसरा रिकामा टेम्पोही (एमएच ०४, ३७७२) या डंपरवर आदळला़या अपघातात टेम्पोचा चालक मुजाराम मेटकर (रा़ शहापूर) हा गंभीररीत्या अडकल्याने त्यास बाहेर निघणेही मुश्कील असल्याने जोरजोरात ओरडत होता़ या घटनेची माहिती अग्निशमन दलास मिळताच लीडिंग फायरमन इक्बाल शेख, फायरमन तानाजी भास्कर, घनश्याम इंफाळ, शिवाजी खुळगे, उदय शिर्के, वाहनचालक देवीदास इंगळे तसेच सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ आदिंसह वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले़ अग्निशमन दलाच्या जवानांनी टेम्पोचा दरवाजा तोडून जखमी चालक मेटकरला बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले़ यानंतर त्यास अधिक उपचारासाठी आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले़ या अपघाताची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)