शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आहेरगावात लोकवर्गणीतून विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:50 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा छोट्या गावात देखील प्रादुर्भाव दिसू लागला आहे. परिणामी अनेकांना जीवास मुकावे लागत आहे, तर गावात संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मात्र, अशा परिस्थितीत गावातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गाव प्रशासनाने पुढाकार घेतला असून, गाव सुदृढ राहण्याकरिता लोकवर्गणीतून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासन सज्ज

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा छोट्या गावात देखील प्रादुर्भाव दिसू लागला आहे. परिणामी अनेकांना जीवास मुकावे लागत आहे, तर गावात संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मात्र, अशा परिस्थितीत गावातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गाव प्रशासनाने पुढाकार घेतला असून, गाव सुदृढ राहण्याकरिता लोकवर्गणीतून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.आहेरगावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गाव कारभाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यात सरपंचांच्या पुढाकाराने ग्राम रक्षक, कुटुंब रक्षक, समाज रक्षक आदी नेमून युवा पिढीला मार्गदर्शन प्रशासनामार्फत केले जात आहे. तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना व तरुणांना संपर्क करून गावात कोणीही कोरोनाबाधित होऊ नये, यासाठी मदत कार्य सुरू केले आहे. शिवाय, कोरोनामुक्त गाव या अभियानांतर्गत विलगीकरण कक्षाची उभारणी केली आहे.ट्रॅक्टर, ब्लोअरच्या साह्याने गाव सॅनिटायझर केले जात आहे. शिवाय गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचारी यांना मार्गदर्शन करून त्यांना सर्वेक्षणासाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायतीच्या मार्फत पुरवले जात आहे. कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्या रुग्णांना विलगीकरण कक्षात हलवले जात आहेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ज्या नागरिकांना कोरोनासंदर्भात कोणतेही लक्षण आढळून आले तर त्यांनी गावात उभारण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षात दाखल व्हावे. म्हणजे आपले संपूर्ण कुटुंब बाधित होणार नाही.- संगीता शिंदे, सरपंच, आहेरगाव.कक्षात विविध सुविधाकोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत आहेरगाव ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या बाहेर २०० मीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सुरक्षिततेच्या दृष्टीने बाधित रुग्णांना विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून, त्या ठिकाणी स्वतंत्र महिला व पुरुष कक्ष, त्यात २४ तास लाईट, डसबिन, टॉयलेट, जेवण आदी सुविधा केल्या आहेत. यासाठी आहेरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच रामकिसन शिंदे, काशीनाथ मोरे, कृष्णा रसाळ, रामराव रसाळ, बाळासाहेब गांगुर्डे, गणेश निकम, धनश्री गवळी, मनीषा मोरे, लक्ष्मीबाई जाधव, स्वाती बागुल, तलाठी कनोज, पोलीस पाटील भरत कोकाटे आदींसह ग्रामविकास अधिकारी भालचंद्र तरवारे व ग्रामपंचायत कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत