शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ओला-सुका कचरा वेगळा करा, अन्यथा दंड भरा

By admin | Updated: March 23, 2017 01:17 IST

नाशिक : महापालिकेने खतप्रकल्पाचे खासगीकरण केल्यानंतर ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण संकलनाच्या स्तरावरच होण्यासाठी १ मे पासून नागरिकांनीच ओला-सुका कचरा वेगळा घंटागाडीत टाकायचा आहे.

नाशिक : महापालिकेने खतप्रकल्पाचे खासगीकरण केल्यानंतर आता ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण संकलनाच्या स्तरावरच होण्यासाठी पावले उचलली असून, १ मे २०१७ पासून नागरिकांनीच ओला-सुका कचरा वेगळा करत घंटागाडीत टाकायचा आहे. तसे न केल्यास नागरिकांना ५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड केला जाणार असून, ठेकेदारांनी ओला-कचरा सुका वेगळा न स्वीकारल्यास त्यांनाही पाच हजार रुपयांपर्यंत दंड केला जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. महापालिकेने खतप्रकल्प खासगीकरणातून चालविण्यास दिला असून, जानेवारीपासून खासगी कंपनीद्वारा तो कार्यान्वित झाला आहे. खतप्रकल्पावर ओला व सुका कचरा वेगळा करत त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आहे. तसेच महापालिकेने घंटागाडीचा नव्याने ठेका देताना ठेकेदारांनाही घंटागाडीत ओला व सुका कचरा यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, काही घंटागाडी ठेकेदारांनी ओला व सुका कचऱ्याच्या संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली तर काही ठेकेदारांनी महापालिकेचा नियम धुडकावून लावला. मुळात नागरिकांनीच घंटागाडीत कचरा टाकताना तो ओला आणि सुका असा वेगळा करून द्यायचा आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वतंत्र दोन डस्टबिन ठेवणे अनिवार्य आहे. सध्या एकत्रित कचराच घंटागाडीत टाकला जातो. त्यात शिळ्या अन्नपदार्थापासून ते घरातील भंगार साहित्य, जुने कपडे, प्लॅस्टिक पिशव्या व बाटल्या यांचा समावेश असतो.  सदर एकत्रित कचरा अलग करताना खतप्रकल्पावर चाळण्या लावण्यात आल्या असल्या तरी वर्गीकरणात मोठ्या अडचणी उद्भवतात, त्यामुळे यंत्रणा नीटपणे चालू शकत नाही. त्यासाठीच महापालिकेने आता ओला व सुका कचरा संकलनाच्या पातळीवरच वेगळा व्हावा यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी येत्या १ मेपासून नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत टाकणे क्रमप्राप्त ठरणार आहे. अन्यथा पहिल्या गुन्ह्यासाठी नागरिकांना ५०० रुपये आणि नंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी १००० रुपये दंड आकारला जाणार आहे. घंटागाडी ठेकेदारानेही एकत्रित कचरा आणल्यास त्यालाही पाच हजारापर्यंतचा दंड केला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)