शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

जिल्हा रुग्णालयात बेवारस गर्भ सापडल्याने खळबळ

By admin | Updated: February 1, 2015 00:05 IST

तर्कवितर्क : सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिन्यामध्ये सुमारे चार महिन्यांचे अर्भक बेवारस अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली़ हे अर्भक या ठिकाणी कसे आले याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात असून, याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक काय निर्णय घेतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे़जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत रुग्णांसाठी सुमारे दहा स्वतंत्र कक्ष आहेत़ दुपारी चार वाजेच्या सुमारास येथील शिपाई जिन्याचे कुलूप लावण्यासाठी जात असताना जिन्यामध्येच साधारणत: चार महिन्यांचे अर्भक फेकलेल्या अवस्थेत आढळून आले़ यानंतर संपूर्ण जिल्हा रुग्णालयात अर्भक सापडल्याची वार्ता कर्णोपकर्णी पसरल्याने या ठिकाणी एकच गर्दी झाली़ यावेळी उपस्थितांमध्ये जिल्हा रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था असताना जिन्याच्या कोपऱ्यात हा गर्भ आलाच कसा, अशी चर्चा सुरू झाली़ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी एखाद्या महिलेचा गर्भपात केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनीच तर हे या ठिकाणी टाकले नसावेना अशीही चर्चा सुरू होती़ या घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांना समजताच त्यांनी तत्काळ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बोलावून घेत या प्रकरणाची माहिती घेतली़ मात्र हे अर्भक या ठिकाणी कसे आले याबाबत कोणीही काही सांगू शकले नाही़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयाची सुरक्षाव्यवस्था व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून या ठिकाणी बेवारस सापडलेल्या अर्भकामुळे विविध प्रश्न निर्माण झाले असून, याबाबत डॉ़ माले काय निर्णय घेतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)