नाशिक - जिल्हा हौसी शरीर सौष्ठव संघटना व फिटझोन जीम यांच्या वतीने जिल्हास्तरीय ेवरिष्ठ नाशिक श्री शरीरसौष्ठव स्पर्धांचे आयोजन रविवारी दि़ १४ करण्यात आल्याची माहिती संघटेनेचे गोपाळ गायकवाड यांनी दिली़ सावरकरनगर येथील रचना लॉन्स येथे सायंकाळी साडेपाच वाजता या स्पर्धांना प्रारंभ होणार आहे़ स्पर्धा ५५ किलो, ६० कि लो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो व त्यापुढील अशा सहा गटांत होणार आहे़ यामध्ये सहभागी शरिरसौष्ठव पटुंची वजन तपाणी ३ ते ५ या वेळात घेण्यात येणार आहे़ यावेळी विश्व श्री २०१४ या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा खेळाडू बी़ महेश्वरन याचा सत्कार करण्यात येणार आहे़
वरिष्ठ नाशिक श्री शरीरसौष्ठव स्पर्धा उद्या
By admin | Updated: December 13, 2014 01:55 IST