शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रारावीकर यांचे दिल्लीत निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 01:15 IST

नाशिक : येथील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत रारावीकर यांचे मंगळवारी (दि.१) नवी दिल्ली येथील निवासस्थानी पहाटे चार वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. आशुतोष रारावीकर यांच्यासह सून व नातू असा परिवार आहे. डॉ. आशुतोष रारावीकर रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी अ‍ॅण्ड रिसर्च विभागाचे संचालक आहेत.

ठळक मुद्दे‘थिंक लाइन’ या अर्थविषयक द्वैमासिकाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.

नाशिक : येथील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत रारावीकर यांचे मंगळवारी (दि.१) नवी दिल्ली येथील निवासस्थानी पहाटे चार वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. आशुतोष रारावीकर यांच्यासह सून व नातू असा परिवार आहे. डॉ. आशुतोष रारावीकर रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी अ‍ॅण्ड रिसर्च विभागाचे संचालक आहेत.पुणे विद्यापीठातून १९६१ मध्ये अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर डॉ. यशवंत रारावीकर यांनी ४१ वर्षे विविध महाविद्यालयांतून अध्यापनाचे काम केले. यातील ३३ वर्ष त्यांनी पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून काम केले. यात १९६४ ते १९६७ दरम्यान तीन वर्षांच्या कालावधीत अहमदनगर जिल्ह्णातील कोपरगाव येथे कला व वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर १९६७ ते १९९६ या तीस वर्षांच्या कालावधीत नाशिकरोड येथील बिटको-चांडक महाविद्यालयात विभाग प्रमुख म्हणून काम करताना पूर्णवेळ अध्यापनाचे काम केले. यातील २५ वर्ष त्यांनी कला व वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे अध्यापन केले. अशाप्रकारे एकूण ३३ वर्ष पूर्णवेळ अध्यापनाचे कार्य करताना दरम्यानच्या काळात त्यांनी १९८० मध्ये पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट आॅफ इकोनॉमिक्समधून पीएच.डी. प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील वाडिया महाविद्यालयात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून क ाम करतानाच हजारो व्याख्याने दिली. कर्तव्यनिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करताना डॉ. रारावीकर यांनी पुणे विद्यापीठात अर्थशास्त्राच्या अभ्यास मंडळाचेही कामकाज पाहिले. नाशिकमधून प्रकाशित होणाऱ्या ‘थिंक लाइन’ या अर्थविषयक द्वैमासिकाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.