शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक संघाची दिंडोरीत गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:07 IST

पालखेड रस्त्याच्या दुरवस्थेला बांधकाम विभागाने दिलेल्या माती-मुरमाच्या मुलाम्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांसह या भागातील रहिवाशांना श्वसनाला त्रास होत आहे. बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत येथील ज्येष्ठ नागरिक संघाने मास्कचे वाटप करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या गांधीगिरी आंदोलनाने तरी प्रशासन जागे होऊन रस्त्याचे नूतनीकरण करणार का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देरस्त्याची दुरवस्था : मास्क लावून वेधले प्रशासनाचे लक्ष

दिंडोरी : शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पालखेड रस्त्याच्या दुरवस्थेला बांधकाम विभागाने दिलेल्या माती-मुरमाच्या मुलाम्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांसह या भागातील रहिवाशांना श्वसनाला त्रास होत आहे. बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत येथील ज्येष्ठ नागरिक संघाने मास्कचे वाटप करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या गांधीगिरी आंदोलनाने तरी प्रशासन जागे होऊन रस्त्याचे नूतनीकरण करणार का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.पालखेड रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून, मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सदर रस्ता रहदारीचा असून, एमआयडीसीत येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची वाट लागली आहे. बांधकाम विभागाने रस्त्यावर माती-मुरुम टाकून वेळ मारून नेली. मात्र त्यामुळे प्रचंड धूळ उडत आहे. या धुळीचा त्रास रहिवाशांसह पादचारी व वाहनधारक होत आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिंडोरी तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने नागरिकांना मास्कचे वाटप करून गांधीगिरी करण्यात येऊन तहसीलदार कैलास पवार यांना संघटनेचे तालुकाध्यक्ष एकनाथ दौंड यांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष संतू मोरे, त्र्यंबक बस्ते, सचिव शांताराम पाटील, प्रमोद पाटील, किसन सातपुते, शंकर राजदेव, बाळ राजे, इलियास सय्यद, अण्णासाहेब कदम, गोपीनाथ घुमरे, दगू सोनवणे, भिका कावळे, दौलतराव दगू बोरस्ते, संपतराव मुरकुटे, अ‍ॅड. फराद पठाण, भास्कर वडजे, यमुनाबाई पाटील, गीताबाई पाटील, राजाराम पाताडे, रामराव क्षीरसागर, भिका ढाकणे, रामकृष्ण वडजे, सुरेश वाघ, पुंडलिक ढगे, शशिकांत वाघ आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते रणजित देशमुख यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग घेतला.धुळीपासून संरक्षण होण्यासाठी पालखेड रस्त्यावरील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मास्कचे वाटप करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभाग व दिंडोरी नगरपंचायत यांच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Strikeसंप