शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

इंदिरानगर बोगद्यासाठी ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर

By admin | Updated: November 18, 2015 22:24 IST

राजकीय परिणाम : लोकप्रतिनिधी अडचणीत

इंदिरानगर : इंदिरानगर येथील बोगदा बंद करण्यास सर्वपक्षीय विरोधानंतरही त्याची पोलीस प्रशासनाकडून दखल न घेतली गेल्याने बोगद्याअभावी त्रास सहन करावा लागत असलेल्या इंदिरानगर व गोविंदनगर येथील ज्येष्ठ नागरिकांनीच आता याकामी पुढाकार घेत पोलीस आयुक्तांना साकडे घालण्याचे ठरविले असून, त्यानंतरही हा प्रश्न न सुटल्यास राजकीय पातळीवर प्रश्न हाताळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची निवडणूक वर्ष-सव्वा वर्षावर येऊन ठेपल्याने इंदिरानगरचा बोगदा बंद करण्याचा प्रश्न निवडणूक प्रचाराचा मुद्दा करण्याचे व त्यावर ठोस निर्णय घेणाऱ्या राजकीय पक्षालाच सहकार्य करण्याची भाषा आता इंदिरानगर, गोविंदनगरच्या ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस यंत्रणेने कोणतीही पूर्वसूचना न देता बोगदा बंद केल्याने इंदिरानगर-गोविंदनगरची संपर्क यंत्रणा ठप्प झाली आहे. वाहनचालकांना उड्डाणपुलाला वळसा घालून दोन्ही बाजूला ये-जा करावी लागत आहे; त्यातून वेळ व इंधन वाया जात असल्याची तक्रार आहे. हे सर्व करूनही बोगद्यातील वाहतुकीचा प्रश्न सुटला तर ठीक आहे, अन्यथा महापालिका निवडणुकीत मते मागण्यासाठी येणाऱ्या राजकीय पक्ष व त्यांच्या प्रमुखांना बोगद्याच्या विषयावर प्रश्न विचारून नागरिकांच्या भावनांशी सहमत असणाऱ्यांनाच मदत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना बोगद्याचा प्रश्न विद्यमान लोकप्रतिनिधींच्या राजकीय भवितव्यावर परिणामकारक ठरू शकण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)