शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ंशिवसेना आक्रमक : टोलमध्ये सूट आणि रोजगाराच्या मागणीसाठी नाका बंदशिंदे टोलनाक्यावर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:00 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोलनाक्यावर २० किलोमीटरच्या अंतरामधील वाहनधारकांना टोल माफी देण्यात यावी, टोलनाक्यावर स्थानिक युवक-युवतींना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी जोरदार आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देचौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाहीवाहनधारकांना टोलमाफी देण्यात यावीशिवसेनेच्या वतीने मोर्चा

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोलनाक्यावर २० किलोमीटरच्या अंतरामधील वाहनधारकांना टोल माफी देण्यात यावी, टोलनाक्यावर स्थानिक युवक-युवतींना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी जोरदार आंदोलन करण्यात आले.नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथील टोलनाका गुरुवारी मध्यरात्रीपासून नाशिक-सिन्नर टोलवेज लि. कंपनीकडून सुरू करण्यात आला. शिंदेगाव टोलनाक्यापासून सिन्नर फाट्यापर्यंत महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. चेहेडी दारणा नदीवरील नवीन पूल, शिंदेगाव येथील पूल, बोगदा व सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झालेले नसताना टोलनाका सुरू करण्यात आल्याचा शिवसेनेचा आरोप आहे.टोलनाक्यावर २० किलोमीटर अंतरामधील ग्रामस्थ, वाहनधारकांना टोलमाफी देण्यात यावी, टोलनाक्यावर स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता शिंदेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. येत्या ३० डिसेंबरपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नाहीतर पुन्हा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नाशिक-सिन्नर टोलवेज लि. कंपनीचे प्रकल्प संचालक सुनील भोसले यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. आंदोलनामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, नगरसेवक केशव पोरजे, अनिल ढेरिंगे, संजय तुंगार, सुधाकर जाधव, नितीन खर्जुल, उज्ज्वला जाधव, वंदना जाधव, शिवाजी भोर, राहुल ताजनपुरे, राजू साबळे, सुदाम ढेमसे, योगेश म्हस्के, सचिन जगताप, अशोक बोराडे, बाजीराव जाधव आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.