शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपामध्ये सिन्नरला खडाजंगी

By admin | Updated: July 7, 2017 23:37 IST

सिन्नर : पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीस सीमंतिनी कोकाटे उपस्थित राहिल्याने शिवसेना व भाजपा गटामध्ये खडाजंगी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीस भाजपाच्या देवपूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे उपस्थित राहिल्याने सत्ताधारी शिवसेना व विरोधी भाजपा गटामध्ये जोरदार खडाजंगी झाली. जिल्हा परिषद सदस्य कोकाटे या सभापतींची पूर्वपरवानगी न घेता बैठकीत बसल्याचा आरोप करीत सत्ताधारी शिवसेना गटाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभापतींनी बैठक तहकूब केल्याची घोषणा केली. पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीस सभागृहात शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे यांच्यासह पाच सदस्य उपस्थित होते. त्यानंतर सभागृहात जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्यासह भाजपाचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार, तातू जगताप व योगीता कांदळकर यांचे आगमन झाले.सभागृहाचे कामकाज सुरू होेताच शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे यांनी जिल्हा परिषद सदस्य कोकाटे यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला. सभापतींची परवानगी न घेता त्या सभागृहात बसल्याच कशा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकाटे यांनी सभापती बर्डे यांच्याकडे सभागृहात बसण्याची परवानगी मागितली. गेल्या बैठकीस नांदूरशिंगोटे गटाचे सदस्य नीलेश केदार यांना बैठकीत बसू दिले होते. त्यामुळे या बैठकीस आपणास बसण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती कोकाटे यांनी सभापती बर्डे यांच्याकडे केली. बर्डे यांनी या बैठकीत बसा, मात्र यापुढे कोणालाही बैठकीस बसू दिले जाणार नाही असे सांगितले. मात्र कातकाडे यांनी पूर्वपरवानगी घेतले नसल्याचे सांगत त्यांना विरोध केला. त्यानंतर गटनेते कातकाडे यांच्यासह शिवसेनेचे सदस्य जगन पाटील भाबड, भगवान पथवे, रोहिणी कांगणे यांच्यासह शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभापती सौ.बर्डे याही सभागृह सोडून गेल्या. त्यामुळे कोकाटे यांच्यासह भाजपाच्या सदस्यांनी सभापती बर्डे यांचे दालन गाठले. पुढील बैठकीस बसू द्यावे अशा लेखी मागणीचे पत्र सभापती बर्डे यांना देऊ केले. अगोदर बर्डे यांनी पोहच देण्यास नकार दिला. त्यामुळे सभापतींच्या दालनातच सत्ताधारी शिवसेना व विरोधी गटाच्या सदस्यांत पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर सभापती बर्डे यांनी पत्रावर पोहच म्हणून स्वाक्षरी दिल्यानंतर भाजपाचे सदस्य दालनातून बाहेर पडले. त्यानंतर प्रभारी गटविकास अधिकारी भारत धिवरे यांच्या दालनात कोकाटे यांच्यासह भाजपाच्या सदस्यांनी प्रवेश केला. जलयुक्त शिवार योजनेच्या गाळ काढणे व नाला सरलीकरणाच्या कामाबाबत भाजपाच्या सदस्यांनी तक्रार केली असताना २४ पैकी १७ कामे एकाच संस्थेस का देण्यात आली याचा जाब विचारण्यात आला. गटविकास अधिकारी तक्रारींची दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.