शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरमध्ये सेना-भाजपच्या प्रेमाची ‘अशीही’ चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

त्र्यंबकेश्वर : सेना-भाजपमध्ये काडीमोड झाल्यापासून एकमेकांत विस्तव काही जात नाही. उलट उलटसुलट विधाने करत शब्दांचे निखारे फुलविण्यातच दोन्ही पक्षांचे ...

त्र्यंबकेश्वर : सेना-भाजपमध्ये काडीमोड झाल्यापासून एकमेकांत विस्तव काही जात नाही. उलट उलटसुलट विधाने करत शब्दांचे निखारे फुलविण्यातच दोन्ही पक्षांचे नेते धन्यता मानत आहेत. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपची सत्ता आहे, तेथील सत्ताधारी तर महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडत असतात. परंतु, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत भाजपची सत्ता असतानाही युती काळात रखडलेली भूमिगत गटार योजना आघाडी सरकारने मंजूर केल्याने भाजपने चक्क सेनेच्या मंत्रिमहोदयांच्या आभाराचे फलक गावात झळकवले आहेत. शहरातील सेना-भाजपमधील हे प्रेम सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने सन २०१८ मध्ये राज्यात भाजप-सेनेचे सरकार असताना सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत शहरातील सांडपाणी गोदावरी नदीत मिसळू न देता ते स्वतंत्र पाईपलाईनद्वारे गावाबाहेरील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रावर सोडण्याचा प्रस्ताव तयार केला होता. सुमारे ३९ कि.मी. पाईप गटार संपूर्ण गावातून फिरवून गावाबाहेर ४ कि.मी. अंतरावरील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रावर सोडण्याचे नियोजन होते. नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. दोन स्वीकृत भाजप सदस्य, नगराध्यक्ष व १४ नगरसेवक मोदी लाटेत निवडून आले आहेत, तर अन्य १ अपक्ष व २ शिवसेना नगरसेवक आहेत. नगरपरिषदेने प्रस्ताव केला, तेव्हा राज्यात भाजपचे सरकार होते. त्या काळात भूमिगत गटार योजनेचा प्रकल्प भाजप सरकारने मंजूर केला नव्हता. सेना-भाजपची युती तुटल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे या प्रकल्पाच्या मंजुरीच्या आशा मावळल्या होत्या. पण आता तब्बल तीन वर्षांनंतर आघाडी सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला. याबाबतचे पत्र घेण्यासाठी नगरपरिषदेचे पदाधिकारी यांना नुकतेच पाचारण केले. त्यानुसार नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, कैलास चोथे व मुख्याधिकारी संजय जाधव यांनी राज्याचे नगरविकासमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आघाडी सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे सांगून पहिल्या टप्प्यात ३४ कोटी रुपये मंजूर केल्याचे पत्र नगराध्यक्षांच्या हाती टेकवत आश्चर्याचा धक्का दिला.

इन्फो

काही भाजपेयींची कुरबूर

त्र्यंबक नगरपरिषदेत भाजपची सत्ता असतानाही महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांनी शहराच्या रखडलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाला मंजुरी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नगरविकास खात्याकडून मंजुरीचे पत्र घेण्यासाठी पाचारण करण्यात आले, तेव्हा काही भाजपच्या नगरसेवकांनी कुरबुरी करत, आपले सरकार नसल्याने कशाला जायचे, असे म्हणत मुंबईला जाणे टाळले. मात्र, शिवसेनेच्या या प्रेमातून उतराई होण्याची संधी भाजप नेत्यांनी सोडली नाही. शहरात एकनाथ शिंदे व आघाडी सरकारचे आभार मानणारे फलक झळकले असून त्यात एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्राला मोठा मान देत छोट्या आकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे छायाचित्र टाकले आहे. प्रसंगानुरूप पक्षनिष्ठा बाजूला ठेवावी, लागते हाच संदेश या फलकातून भाजपने दिल्याची चर्चा आहे.

फोटो- ०८ त्र्यंबकेश्वर नगरपरिषद

080721\08nsk_30_08072021_13.jpg

फोटो- ०८ त्र्यंबकेश्वर नगरपरिषद