शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

घंटागाडी कर्मचाऱ्यांची ‘सेल्फी’ हजेरी

By admin | Updated: April 11, 2017 01:48 IST

पाथर्डी फाटा : घंटागाडी सक्षम चालविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे घंटागाडी चालकांना ‘सेल्फी’ हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. अशाप्रकारे होणाऱ्या हजेरीमुळे अनेकांचे लक्ष वेधले जात आहे.

नवीन नियम : दंडात्मक कारवाई रोखण्यासाठी तत्परतापाथर्डी फाटा : घंटागाडी सक्षम चालविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे घंटागाडी चालकांना ‘सेल्फी’ हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. अशाप्रकारे होणाऱ्या हजेरीमुळे अनेकांचे लक्ष वेधले जात आहे.  सिडको विभागासाठी एकूण ३४ घंटागाड्या तैनात असून, त्यांची पार्किंगची व्यवस्था शहराबाहेर खतप्रकल्पाच्या जवळील जकात नाक्यावर करण्यात आली आहे. येथे उभ्या केलेल्या घंटागाड्या सकाळी सहापासूनच नेमून दिलेल्या प्रभागात जाण्यासाठी बाहेर पडू लागतात. गाडीवरचा कर्मचारी आणि चालक यांची मोबाइलवर सेल्फी हजेरी घेऊन ती लगेच मनपाच्या संबंधित विभागाला पाठवली जाते. गाड्या पार्क केलेल्या जागेवर मोबाइलला रेंज मिळत नसल्याने महामार्गालगत सर्व्हिस रोडवर हजेरीला सुरु वात होते.  रांगेत उभ्या केलेल्या कर्मचाऱ्यांचा येथील सुपरवायझर फोटो काढून लगेच तो मोबाइलवरून फॉरवर्ड करतात. तेथून चालक गाडी ताब्यात घेतात. या गाड्यांमध्ये डिझेल भरून त्या लगेच प्रभागांमध्ये रवाना केल्या जातात. ही सर्व प्रक्रि या सकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण करावी लागत असल्याचे ठेकेदाराचे पर्यवेक्षक कैलास बोडके यांनी सांगितले. सर्व घंटागाड्यांना जीपीआरएस यंत्रणा बसविलेली असल्याने तिचे लोकेशनही मनपाच्या संबंधित यंत्रणेला तपासता येते. गाडी प्रभागात उशिरा पोहचली तर पाच हजार रुपये आणि गाडी प्रभागात गेलीच नाही (त्या दिवशीची गैरहजेरी) तर आठ हजार रुपये दंड आकारला जात असल्याचे बोडके यांनी सांगितले.  कचरा संकलन करून तो खतप्रकल्पात खाली केल्यानंतर तीन वाजेपर्यंत गाड्या पुन्हा त्याच ठिकाणी नोंद करून पार्क केल्या जातात. एखाद्या गल्लीत गाडी जाऊ शकली नाही तरी त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागत असल्याचे चालकांनी सांगितले. ठिकठिकाणी वास्तव्यास असलेले कर्मचारी व चालक यांना सकाळी सहापर्यंत पार्किंगच्या ठिकाणी पोहचताना मोठी धावपळ करावी लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)