शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सप्तश्रुंग निवासनी देवी ट्रस्टच्या विश्वस्तांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 00:14 IST

कळवण : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्य पीठाचा महिमा असलेले कळवण तालुक्यातील श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मंडळावर पाच विश्वस्त सदस्यांच्या ...

ठळक मुद्देप्रथमच महिलेला संधी : नाशिकचेचौघे तर कळवणच्या एकाचा समावेश

कळवण : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्य पीठाचा महिमा असलेले कळवण तालुक्यातील श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मंडळावर पाच विश्वस्त सदस्यांच्या नियुक्तीचा आदेश प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवासे यांनी मंगळवारी काढला. त्यात प्रथमच महिलेला स्थान देण्यात आले असून कळवणचे युवा विधीतज्ञ ललित निकम यांचा विश्वस्त म्हणून समावेश झाला आहे.उत्तर महाराष्ट्र सह राज्यातील, देशातील भाविक, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी देवी संस्थांनच्या विश्वस्तांची मुदत संपल्याने पुढील पाच वर्षासाठी नव्याने पाच विश्वस्त मंडळ नेमणुकीसाठी २ सप्टेंबरला प्रक्रि या कार्यन्वीत करण्यात येऊन जिल्ह्यातील पात्र उमेदवाराकडून १० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कार्यालयात ५ जागांसाठी २५८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांच्या २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान मुलाखती घेण्यात आल्या. उमेदवारांच्या मुलाखती व परिचय पत्रचा विचार करु न निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार १ आॅक्टोबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी कळवण येथील अ‍ॅड. ललित रवींद्र निकम, अ‍ॅड. दीपक राजाराम पाटोदकर (नाशिक), मनज्योत युवराज पाटील (नाशिक), डॉ. प्रशांत सुखदेव देवरे(नाशिक), भूषणराज शशिकुमार तळेकर (नाशिक) या पाच उमेदवारांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली.स्थानिक नाराज ...श्रीसप्तश्रृंगी देवी गड हे कळवण तालुक्यातील एक जागृत देवस्थान असून, ज्या गावात हे देवस्थान आहे त्या गावातील स्थानिक प्रतिनिधी विश्वस्त मंडळावर घेणे अपेक्षित होते. प्रदीर्घ काळापासून स्थानिक ग्रामस्थ यांच्या मागणीकडे यंदाही दुर्लक्षच झाल्याने स्थानिक पातळीवर नाराजीचा सूर आहे.देवस्थान ट्रस्टला गावाने जागा दिली. विविध प्रकारची मदत करण्यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ सतत प्रयत्नशील असतात. बोकडबळी अथवा देवस्थान, गावाशी निगडीत अनेक निर्णय घेतांना स्थानिकांचीच जास्त गरज भासते. स्थानिकांना यंदा विश्वस्त मंडळात सामावून घेऊ असे आश्वासन बोकडबळी बंदी निर्णयावेळी देण्यात आले होते. मात्र विचार केला नाही, हा आमच्यावर एकप्रकारे अन्यायच झाल्याचे सप्तश्रुंग गडाचे माजी सरपंच राजेश गवळी यांनी सांगितले.यंदा प्रथमच स्थानिक व्यक्तींची नियुक्ती करणेबाबत पत्रव्यवहार केला होता. मुलाखत प्रक्रि या देखील पार पडली. मात्र यंदाही स्थानिक पातळीवर प्रतिनिधित्व दिले गेले नाही. हा सरळसरळअन्यायच करण्यात आला असून या निर्णयाविरोधात एक याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरkalwan-acकळवण