शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:44 IST

मालेगाव महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची आणि महिला व बाल कल्याण समितीच्या ९ सदस्यांची शनिवारी झालेल्या विशेष महासभेत निवड करण्यात आली आहे.

मालेगाव : महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची आणि महिला व बाल कल्याण समितीच्या ९ सदस्यांची शनिवारी झालेल्या विशेष महासभेत निवड करण्यात आली आहे.महापौर रशीद शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत विशेष महासभा पार पडली. स्थायी समितीच्या १३ सदस्यांनी राजीनामे सादर केल्यानंतर महासभेत सर्वपक्षीय गटनेत्यांनी स्थायी समिती आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांची नावे असलेली बंद पाकिटे महापौर रशीद शेख यांच्याकडे सादर केली होती. नगरसचिव राजेश धसे यांनी बंद पाकिटे उघडून गटनेत्यांनी सादर केलेली नावे सभागृहात वाचून दाखविली. यापूर्वी स्थायी समिती सदस्य असलेल्या कॉँग्रेसच्या ताहेरा शेख, शिवसेनेचे जयप्रकाश बच्छाव, एमआयएमचे डॉ. खालीद परवेझ यांची नावे व निवड वगळता इतर नवीन सर्वपक्षीय १३ सदस्यांची निवड करण्यात आली. १६ सदस्यीय असलेल्या स्थायी समितीत कॉँग्रेसकडून हमीदाबी शेख जब्बार, निहाल अहमद मो. सुलेमान, अन्सारी मो. अस्लम खलील अहमद, रशीदाबी अब्दुल मनान, फकीर मो. शेख सादीक, महागठबंधन आघाडीकडून सय्यद शबानाबानो सय्यद अकील, जैबुनिसा समसुदोहा, अन्सारी आय्याज अहमद मो. सुलतान, अन्सारी मो. सादीक मो.रशीद, मोहंमद सुभान मो. अय्युब, शिवसेनेचे नीलेश आहेर, भाजपचे मदन गायकवाड, भरत बागुल आदींची निवड करण्यात आली. तर महिला व बाल कल्याण समितीत कॉँग्रेसच्या मो. कमरुन्निसा रिजवान, नुरजहॉँ मो. मुस्तफा, सलीमाबी सय्यद सलीम, महागठबंधन आघाडीच्या अन्सारी साजेदा रशीद, अख्तरुन्निसा मोहंमद सादीक, अन्सारी साबीया मोहंमद मुज्जमील, शिवसेनेच्या कविता बच्छाव, भाजपच्या सुवर्णा शेलार, एमआयएमच्या मोमीन रजीया शाहीद अहमद आदींची निवड करण्यातआली.सभागृहातील पक्षीय बलाबलानुसार कॉँग्रेसचे ६, महागठबंधन आघाडीचे ५, शिवसेना- भाजप प्रत्येकी २ व एमआयएमचे १ अशा सोळा सदस्यांची वर्षभराच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे. विद्यमान स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव यांचा कार्यकाळही १३ आॅगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. यासाठी निवडप्रक्रिया घेतली जाणार असून, एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ यांची स्थायी समिती सभापतिपदी निवड निश्चित मानली जात आहे.यांनी दिले राजीनामेमहापालिकेचे स्थायी समितीचे सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी विशेष महासभेत राजीनामे सादर केले होते. यात कॉँग्रेसचे रिहानाबानो ताजोद्दीन, अब्दुल अजीज अब्दुल सत्तार, नजीर अहमद इर्शाद, सलीमाबी सय्यद सलीम, शिवसेनेचे नारायण शिंदे, कल्पना वाघ, महागठबंधन आघाडीचे शेख जाहीद शेख जाकीर, अ. बाकी मो. इस्माईल, अन्सारी अतिक कमाल, यास्मीनबानो एजाज बेग, भाजपचे सुनील गायकवाड, विजय गोविंद या तेरा सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर नवीन तेरा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.महापौर निवडणुकीत साथ देणाऱ्या शिवसेना, एमआयएम या पक्षांना स्थायी समिती सभापतीपद प्रत्येकी एक वर्षासाठी देण्याचा शब्द महापौर रशीद शेख यांनी दिला होता. शिवसेनेला सभापतीपद देण्यात आले आहे. आता एमआयएमला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवPoliticsराजकारण