नाशिक : चॉपरचा धाक दाखवून तवलीफाटा परिसरात दहशत पसरविणाऱ्या मयूर प्रभाकर भोये व यशवंत गुलाब चौधरी (रा. दोघे रामनाथनगर, तवलीफाटा) या दोघांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुरुवारी (दि़ ७) दुपारच्या सुमारास हातात चॉपर घेऊन हे दोघे परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक पी़ यू़ वाघचौरे यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून या दोघांना ताब्यात घेतले़ या प्रकरणी विजय विधाते यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे़ (प्रतिनिधी)
दहशत पसरविणाऱ्या दोघांकडून हत्यार जप्त
By admin | Updated: July 8, 2016 23:48 IST