शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीमंतिनी कोकाटे : किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन चर्चासत्र संधी चालून येत नाही ती मिळवावी लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:17 IST

सिन्नर : संधी चालत येत नाही ती मिळवावी लागते. यशस्वी होण्यासाठी संधीचे सोने करावे लागत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले.

ठळक मुद्देमुलींनीही राजकारणात सक्रिय व्हायला हवेप्रतिकार करायला शिकले पाहिजे

सिन्नर : संधी चालत येत नाही ती मिळवावी लागते. यशस्वी होण्यासाठी संधीचे सोने करावे लागत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले.येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस.जी. पब्लिक स्कूलच्या माध्यमिक विभागात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. हिराताई गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या किशोरवयीन मुलींच्या सुमपदेशन चर्चासत्रास व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, अभिषेक गडाख, मुख्याध्यपक रघुनाथ एरंडे, अनिता थोरात, पोलीस दलातील दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी, डॉ. मनीषा आहेर, शिक्षण विस्तार अधिकारी मंजुषा साळुंखे, बहि:शाल शिक्षण मंडळाच्या व्याख्यात्या सविता देशमुख आदी उपस्थित होते. राजकारण केवळ पुुरुषांसाठीच नसून स्त्रियाही या क्षेत्रात चांगली कामगिरी करीत आहेत. गावच्या तालुक्याच्या कारभारात सहभागी होण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळते. शिवाय समाजसेवा करण्याचे समाधानही मिळते. मुलींनीही राजकारणात सक्रिय व्हायला हवे, असेही त्या म्हणाल्या. पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी यांनी दामिनी पथक मुलींसाठी व महिलांसाठी कसे कार्य करते याविषयी ध्वनी चित्रफीत दाखवून मार्गदर्शन केले. मुलींनी प्रतिकार करायला शिकले पाहिजे. कुठलीही अडचण असल्यास १०९१ या सहायता व सुरक्षा क्र मांकावर फोन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजीवनी गजभार, चंद्रकला साळुंखे, पुष्पा जाधव, प्रियांका देवकर, रोहिणी तुपे, शीतल उशीर, वैशाली कोळपे, सुवर्णा सातपुते, तबस्सुम शेख, रुपाली खैरनार, गीतांजली भवर, शुभांगी मोगल, सुवर्णा शिंदे, वैशाली राऊत, प्रियंका सहाणे, प्राजक्ता डुंबरे, रोहिणी वर्वे, रेश्मा कापडी आदींनी प्रयत्न केले.