शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी मागणी : सीमा हिरे यांनी केल्या विविध सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:12 IST

सिडको : आमदार सीमा हिरे यांनी उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक खोडसकर हेदेखील उपस्थित होते.

ठळक मुद्देदोन्ही पर्याय पूर्णत: बंद करणेराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

सिडको : आमदार सीमा हिरे यांनी उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक खोडसकर हेदेखील उपस्थित होते. लेखानगर उड्डाणपूल वळण मार्ग तयार करणे, इंदिरानगर जंक्शन येथील चारही बाजूने सर्व्हीस रोड, इंदिरानगर-गोविंदनगर बोगद्याजवळील मुंबईकडून येणारा डाउन व मुंबईकडे जाणारा अप हे दोन्ही पर्याय पूर्णत: बंद करणे व याठिकाणी असलेला सर्व्हीस रोड मोठा करणे, तसेच हॉटेल सेव्हन हेव्हन येथे मुंबईकडे पुलावर जाण्यासाठी मार्ग अप तयार करणे, स्प्लेंडर हॉलजवळ सिडको-सातपूर अंबड भागात जाणाºया वाहनांना पुलावरून खाली उतरण्यासाठी नवीन मार्ग तयार करणे, एसबीआय चौक येथून धुळे व इतर ठिकाणी जाणाºया वाहनांना पुलावर जाण्यासाठी नवीन मार्ग तयार करणे तयार करणे, इंदिरानगर येथे सिग्नल यंत्रणा बसविणे आदी कामे करणेबाबत चर्चा करण्यात आली. यासंबंधी लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी केली होती. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून रुपये चार कोटी २० लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. ही कामे प्रगतिपथावर असून विल्होळी येथील सर्व्हीस रोडचे कामही प्रगतिपथावर आहे. या कामांची आमदार सीमा हिरे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक खोडसकर यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक सतीश सोनवणे, अ‍ॅड. श्याम बडोदे, शहर सुधार समिती अध्यक्ष भगवान दोंदे, नगरसेवक पुष्पा आव्हाड, भाग्यश्री ढोमसे, दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे यांच्यासह सचिन कुलकर्णी, सुनील खोडे, डॉ. वैभव महाले, मनोज बिरार, प्रकाश चकोर, शैलेश साळुंखे, कमलाकर गायकवाड, शोभाताई सोनवणेउपस्थित होते.