शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

भाजपातील गुन्हेगारीकरणावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: May 28, 2017 01:21 IST

नाशिक : जालिंदर उगलमुगले याच्या खूनप्रकरणी भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यास पोलिसांनी गजाआड केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जालिंदर उगलमुगले याच्या अपहरण व खूनप्रकरणी संशयित म्हणून भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यास पोलिसांनी गजाआड केल्यानंतर भाजपातील गुन्हेगारीकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांना पक्षात पावन करून घेण्यात आघाडीवर असलेल्या शहराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह लावले जात असून, पक्षातून विरोधी सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी सहा महिने अगोदर नाशिकरोड विभागातील दोन प्रभागांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे शहराध्यक्ष तथा विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी तत्कालीन अपक्ष नगरसेवक व गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या पवन पवार यास पक्षात पावन करून घेतले होते. शहराध्यक्षांच्या या कृतीविरुद्ध त्याचवेळी पक्षांतर्गत भडका उडाला होता. अन्य दोन आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. भाजपाशी संबंधित संघपरिवारही नाराज झालेला होता. मात्र, सानप यांनी पोटनिवडणुकीत भाषण ठोकताना पवन पवार यांच्यामुळेच आपण आमदार म्हणून निवडून आल्याचे छातीठोकपणे सांगत एकप्रकारे गुन्हेगाराचेच समर्थन केले होते. पोटनिवडणुकीत दोन्ही जागा भाजपाच्या पदरात पडल्याने शहराध्यक्षांचा उत्साह आणखी दुणावला आणि पक्षात त्यांच्या एकाधिकारशाहीला बळ मिळत गेले. त्यामुळेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्यांना पक्षाचे दरवाजे खुले करण्यात आले. त्यातूनच काही मर्जीतील उमेदवारांना शहराध्यक्षांनी तिकीट वाटप केले. त्यातील काही निवडूनही आले. पंचवटी विभागातून निवडून आलेल्या भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यास आता पोलिसांनी खूून प्रकरणात गजाआड केल्याने भाजपातील गुन्हेगारीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा