शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात वाटली बियाण्यांची पाकिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 13:30 IST

घोटी : देशी बियाण्यांच्या संवर्धनातून शेतकº्यांची आत्मनिर्भरता व्हावी, देशी वाणांची जपणूक करून सेंद्रिय शेतीचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी लग्नसमारंभात ...

ठळक मुद्दे देशी बियाणे संवर्धन :   कृषी अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्र म

घोटी : देशी बियाण्यांच्या संवर्धनातून शेतकº्यांची आत्मनिर्भरता व्हावी, देशी वाणांची जपणूक करून सेंद्रिय शेतीचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी लग्नसमारंभात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. देशी वाण असलेले गुलाबी मुळा, डांगर, खरबूज, चाकवत, कोथिंबीर आणि राजगिरा बियाण्यांचे वº्हाडी मंडळीला पाकीट देण्यात आले. बियाण्यांची लागवड, उत्पादन आणि संवर्धन करण्यासाठी झटणारे कृषी विभागाचे अधिकारी संजय पाटील यांच्या या उपक्र माचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.इगतपुरी तालुक्यात सेवा बजावलेले कृषी खात्याचे अधिकारी संजय पाटील यांचे चिरंजीव गौरांक याचा विवाह रामदास सराफ यांची कन्या प्रियंका हिच्यासोबत नुकताच संपन्न झाला. यावेळी देशी बियाण्यांची लागवड करण्यासाठी बियाण्यांचे पाकीट स्वागत करतांना अक्षदांसोबत देण्यात आले.सगळीकडे विषमुक्त सकस भाजीपाला व अन्नधान्य नसल्यामुळे अनेकजण आजारांनी ग्रस्त आहेत. अति रसायनांसह कीटकनाशकांचा वापर, देशी बियाण्यांची कमतरता यामुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. या पाशर््वभूमीवर लग्नात स्वागत करतांना देशी बियाणे वाटपाच्या उपक्र माद्वारे संवर्धनाचा संदेश देण्यात आला. देशी बियाण्याचे जतनातून मिळणाºया पोषक व सकस आहाराद्वारे शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी या उपक्र माची संकल्पना सुचली असे संजय पाटील यांनी सांगितले. भविष्यातील पुढील पिढी जपण्यासाठी या उपक्र माद्वारे हा अल्पसा प्रयत्न वºहाडी मंडळीला भावला. देशी बियाण्यांची बँक सांभाळणाºया कोंभाळणे ता. अकोले येथील राहीबाई पोपेरे, भिल्ली येथील रमेश साकरकर यांच्याकडून मागवलेल्या देशी बियाण्यांची पाकीटे लग्न समारंभात वितरित करण्यात आली.प्रतिक्रि याविविध प्रकारच्या विदेशी कंपन्याद्वारे खते, बियाणे, कीटकनाशके वापराबाबत प्रचार प्रसिध्दीस सर्वजण बळी पडत आहेत. भूमातेच्या संवर्धनासह समृध्दीसाठी कमीत कमी रसायनांचा, कीटकनाशकांचा वापर करून सेंद्रीय शेती समृध्द करण्यासाठी या उपक्र माची संकल्पना आहे.- संजय पाटील, वर पिता, देशी बियाणे संवर्धक