शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची सुरक्षा ‘सोमेश्वर भरोसे’

By admin | Updated: July 25, 2016 00:34 IST

जीवघेणे फोटोसेशन : संरक्षक कठडे नावापुरतेच

अझहर शेख  नाशिकसोमेश्वर धबधबा खळाळून वाहत असल्याने पर्यटकांना मोह आवरणे अवघड होत आहे. धबधब्याचे नयनमनोहारी दृश्य डोळ्यांत साठविताना पर्यटक जीव धोक्यात घालताना दिसून येत आहे. धबधब्याजवळचे संरक्षक कठडे नावापुरतेच उरले आहेत. पर्यटक थेट नदीपात्रात जाऊन फोटोसेशन करत असून, दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा ‘सोमेश्वर भरोसे’च आहे.पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले आपोआपच सोमेश्वर धबधब्याकडे वळतात. चौथा शनिवार असल्यामुळे शासकीय कार्यालयांपासून तर औद्योगिक क्षेत्र तसेच शाळा, महाविद्यालयांनाही सुटी होती. दुपारनंतर पावसालाही सुरुवात झाल्याने नाशिककर मोठ्या संख्येने धबधबा बघण्यासाठी सोमेश्वरला आले होते. दुपारी चार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धबधब्याच्या परिसरात आबालवृद्ध आनंद लुटताना दिसून आले. यावेळी काही तरुण-तरुणींचे समूह सेल्फी काढण्यासाठी कसलीही तमा न बाळगता जीवघेणी कसरत करत होते. काही पर्यटक जेथून धबधबा कोसळत आहे त्याच खडकावर जाऊन सेल्फी घेत होते. खडकावर शेवाळ आल्याने पर्यटकांचा पाय घसरून तोलही जात होता. काही अतिउत्साही तरुण-तरुणी बेभानपणे जिवावर बेतणारे कृत्य करत धबधब्याजवळ जाण्याचे धाडस करताना आढळले. एकीकडे महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने या पर्यटनस्थळावर कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही, तर दुसरीकडे पर्यटकांचा बेभानपणा दुर्घटनेला निमंत्रण देणारा ठरत होता.