शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन चुकल्यास सेक्टर अधिकारी जबाबदार

By admin | Updated: August 10, 2015 23:06 IST

एकनाथ डवले : अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी

नाशिक : निवडणुकीची जबाबदारी टाळण्यासाठी अनेक विध कारणे सांगितले जातात, त्यापेक्षा कुंभमेळ्याचे काम अधिक जोखमीचे व जबाबदारीचे आहे, जमणार नसेल तर आत्ताच सांगा, त्यावरून तुम्ही काहीच कामाचे नाही हे सिद्ध होईल, सेक्टर अधिकारी म्हणून सक्षम महिला अधिकाऱ्यांवरही जबाबदारी टाकण्यात आली असून, ज्यांना ही जबाबदारी देण्यात आली, त्यांनी ती पार पाडावी नियोजन चुकल्यास अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरण्यात येईल अशी तंबी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिली. सिंहस्थासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रारंभी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी व विशेष करून त्र्यंबकेश्वरच्या व्यवस्थेची माहिती दिली, तर महापालिका आयुक्तांनी साधुग्राम, शाही मिरवणूक मार्ग, स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी याची माहिती सादर केली. शहर व ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी कायदा-सुव्यवस्था, बंदोबस्त, भाविक मार्ग आदिंची माहिती सादर केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा एकूणच आढावा घेतल्यानंतर सेक्टर अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या कामांबाबत जबाबदारीचे भान करून देण्यात आले तसेच त्यांच्याकडून अपेक्षित कामांची जाणीवही करून देण्यात आली. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम करण्याची संधी चालून आली असली तरी, अशी जबाबदारी टाळण्यासाठी कारणे सांगू नका, आजारी असाल तर आजच सांगून टाका म्हणजे ऐनवेळी फजिती नको, महिला अधिकारी सक्षमपणे कामे करू लागली आहेत, पुरुष अधिकाऱ्यांनी कारणे सांगून टाळाटाळ करणे म्हणजे कर्तव्यापासून पलायन करण्यासारखे असून, ज्यांच्यावर जबाबदारी टाकली ते सक्षमपणे पेलतील अशी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. सेक्टर अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्यावर जवळपास साठ तासांहून अधिक वेळ अविरत काम करावे लागणार असल्याने त्यांनी त्या तयारीनिशीच हजर व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. दुपारच्या सत्रात प्रत्येक सेक्टर अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह प्रत्यक्ष सेक्टरला भेट देऊन पाहणी केली.डॉक्टरला मारहाण करून लाखोंचा ऐवज लुटलानामपूर : बागलाण तालुक्यातील बिजोरसे येथे शेतातून परतत असताना येथील स्वामी समर्थ सोसायटीतील डॉ. राजेश मोरे यांना अज्ञात चोरट्यांनी बेदम मारहाण करून सुमारे ३५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह एक लाख रुपयांचा ऐवज लूटून नेला. काही दिवसांपासून परिसरात वाटमारीच्या घटना वाढल्यामुळे भयभीत झाले आहेत.(वार्ताहर)वाढवावी, अशी मागणी केली आहे. डॉ. मोरे बिजोरसे यांनी गेल्या आठवड्यात उन्हाळ कांद्याचे दर वाढल्यामुळे एक ट्रक कांदा विकला होता. या विक्रीतून मिळालेल्या ५० हजार रुपयांतून मजुरांचे पगार देण्यासाठी तेगेले होते. तेथून परतत असताना मोराने परिसरात तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटार सायकल अडवून त्यांना बेदम मारहान करत त्यांच्या जवळील ३५ हजार रुपये व अडिच तोळे सोन्याची साखळी असा सुमारे एक लाख रुपये किमतीचा ऐवज लूटून नेला आहे.दरम्यान, चोरट्यांनी केलेल्या मारहानीत मोरेंचा डोळ््याला व पोटाला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर पोलीस दुरक्षेत्रात एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले. त्यानंतर त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ( वार्ताहर )