शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारासाठी शिवसेनेकडूनच गुप्त बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST

नाशिक : महापालिकेत घरपट्टी-पाणीपट्टीचे खासगीकरण करण्यासाठी शिवसेनेचाच छुपा अजेंडा असून, त्यांनी यासंदर्भात गुप्त बैठका घेऊन तसेच आयुक्तांवर दबाव ...

नाशिक : महापालिकेत घरपट्टी-पाणीपट्टीचे खासगीकरण करण्यासाठी शिवसेनेचाच छुपा अजेंडा असून, त्यांनी यासंदर्भात गुप्त बैठका घेऊन तसेच आयुक्तांवर दबाव आणून महासभेवर प्रस्ताव सादर करण्यास भाग पाडले, असा गौप्यस्फेाट महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी केला. विविध योजनांसाठी सोयीचे ठेकेदार आणून प्रत्यक्षात मात्र भाजपचे षड्‌यंत्र रचण्यात आले, असेही ते म्हणाले.

घरपट्टी-पाणीपट्टीचे खासगीकरण करण्याचे घाटत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर भाजपमधील काहींनी त्यास विरोध केला. हीच संधी साधून शिवसेनेनेही भाजपवर टीका केली; मात्र शुक्रवारी (दि.८) सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी भाजपवर पलटवार केला असून, त्यात खासगीकरणातून मन्नुभाई आणण्यामागे शिवसेनेनेच घाट घातला असल्याचा आरोप केला.

नाशिक महापालिकेत घरपट्टी आणि खासगीकरणासाठी एका ठेकेदारासमवेत शिवसेनेने गुप्त बैठक घेतली आणि त्यांच्या समझोत्यानंतरच आयुक्तांची भेट शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतली. राज्यात असलेल्या सत्तेचा दबाव आयुक्तांवर आणून खासगीकरणाचा प्रस्ताव आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ऐनवेळी ज्यादा विषयात हा विषय मांडण्यात आल्याने भाजपने दाखलमान्य झाला असला तरी त्यावर कोणत्याही प्रकारे चर्चा करण्यात आली नाही; मात्र विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपने प्रशासनाचा विषय मागे घेतला, असे सतीश सोनवणे व गटनेता जगदीश पाटील यांनी सांगितले.

नाशिक महापालिकेत नोकर भरतीसाठी राज्य शासन परवानगी देत नाही. शासनाच्या काही जाचक अटींमुळे महापालिकेत काही कामांचे खासगीकरण केले जात आहे, अशा स्थितीत आपला डाव फसल्याने शिवसेना सैरभैर हाेऊन भाजपवर आरोप करीत आहे, असेही सोनवणे पाटील म्हणाले.