नाशिकचा ग्रामउत्सव म्हणून श्रीराम गरुड रथयात्रेची देशभर ओळख आहे. श्रीराम नवमीनिमित्त पंचवटीत शेकडो वर्षांपासून राम व गरुड मिरविला जातो. रामनवमीनंतर दोन दिवसांनी येणाऱ्या कामदा एकादशीला पारंपरिक पद्धतीने रामाच्या पादुका, भोग मूर्तीची सवाद्य रथातून मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. तर रथोत्सवाची अडीचशे वर्षांपासूनची परंपरा असून रथोत्सव यात्रेत शेकडो भाविक सहभागी होतात. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी होऊ खबरदारी म्हणून धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना बंदी घालून संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत. दरवर्षी रथोत्सवात शेकडो भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्या गर्दीत संसर्ग होण्याची शक्यता असल्याने प्रशासन रथोत्सवाला परवानगी देणार की नाही, हे सध्यातरी अनिश्चित आहे. त्यामुळे श्रीराम, गरुड रथोत्सव यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याचे बोलले जात आहे.
रथोत्सवावर दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST