शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

हरणबारीचे दुसरे आवर्तन आज सुटणार

By admin | Updated: February 18, 2017 00:41 IST

दबाव : तीन दिवस अगोदरच सोडले डावा व उजव्या पोटचारीत पाणी

नामपूर : हरणबारीचे दुसरे आवर्तन शनिवारी (दि. १८) सोडण्यात येणार असल्याची माहिती हरणबारी कालव्याचे शाखा अभियंता संजय पाटील यांनी दिली. गेल्या १५ दिवसांपासून मोसम खोऱ्यात शेतपिकासोबत पिण्याचा व जनावरांचा पाणीप्रश्न गंभीर होत चालला होता. पाहिले आवर्तन सुटून दोन महिने पूर्ण झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा पिके करपू लागली होती. याबाबत बागलाणसह मालेगाव तालुक्यातील जनतेने पाण्याचे रोटेशन मिळावे म्हणून खाकुर्डीचे पवन ठाकरे, नामपूरचे माजी सरपंच सोमनाथ सोनवणे, टेभेचे सरपंच भाऊसाहेब अहिरे यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी केलेली होती. प्रखर मागणी लक्षात घेता हरणबारी कालवा निरीक्षक समितीने बैठक घेऊन तत्काळ आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत.सदर आवर्तन २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, ३५० एमसीएफटी पाणी सोडले जाणार असून, किमान ५०० क्यूसेस पाणी नदीपात्रात सुरू राहील, अशी माहिती शाखा अभियंता संजय पाटील यांनी दिली आहे. हे आवर्तन सुटल्यास  मोसम नदीकाठावरील शेती सिंचनासोबत पिण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे शेतकरी समाधानी दिसत आहे. (वार्ताहर)