शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात आढळला दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आरोग्य यंत्रणेची धावपळ : दिल्लीहून परतल्याचा प्रशासनाला संशय; चौदा जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 01:29 IST

नाशिक : दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सुधारत असतानाच दोन दिवसांपासून मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी (दि. ६) आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली.

नाशिक : दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सुधारत असतानाच दोन दिवसांपासून मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी (दि. ६) आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. शहरातील उच्चभ्रू वस्तीत राहणारा हा रुग्ण अलीकडेच दिल्लीहून परतल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे त्याच्याशी संबंधित व्यक्ती, नातेवाइकांचा युद्धपातळीवर शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ५५ रुग्णांपैकी चौदा जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.एकीकडे अशी स्थिती असताना शनिवारी प्रकृतीच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या एका ४४ वर्षीय व्यक्तीचा नमुना पॉझिटिव्ह येऊन तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे. त्याला तातडीने स्वतंत्र कक्षात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार सुरू करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक, मित्र, हितचिंतकांचा शोध घेतला जात आहे. संशयिताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पिंपळगाव बसवंत येथील भाजी बाजारात ग्रामस्थांनी संचारबंदीचे गांभीर्य न बाळगता सोमवारी गर्दी करीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविल्याचे निदर्शनास येताच पोलीस प्रशासनाने बंदोबस्त कडक केला आहे.पहिल्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणानाशिक जिल्ह्यात कोरोनासदृश लक्षणांवरून आजवर दाखल करण्यात आलेल्या २२१ रुग्णांपैकी १७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणा काहीशी निर्धास्त होती. मात्र दहा दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या