लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सुट्यांचा हंगाम, प्रवाशांची गर्दी, वाढते ऊन, लागणारा वेळ या साऱ्यांचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाच्या बस, रेल्वे आदिंऐवजी खासगी टॅ्रव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सध्या हंगामी दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. गर्दीचा हंगाम लक्षात घेता ट्रॅव्हल्सवाल्यांनी १० ते १५ टक्के दरवाढ केली असून, महिनाभर ही दरवाढ राहण्याची शक्यताही त्यांच्याकडून बोलून दाखविली जात आहे. ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांची गर्दी होत असली तरी दर वर्षीच्या तुलनेत यंदा ती कमीच असल्याचेही संचालकांकडून सांगण्यात आले. कडक उन्हाळा, नोटाबंदीमुळे चलनाची कमतरता आदि कारणांमुळे गर्दीवर परिणाम झाल्याचेही समोर येत आहे. नाशिकमधून देशभरातील प्रमुख ठिकाणी ट्रव्हल्स सेवा दिली जात असून, प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यास मदत होत आहे.
खासगी बसेसमध्ये हंगामी दरवाढ
By admin | Updated: May 9, 2017 02:31 IST