शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सायझिंगप्रश्नी विशेष महासभेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:34 IST

मालेगाव शहर पूर्णत: वस्त्रोद्योगावर अवलंबून असणारे शहर आहे. मात्र यंत्रमाग व्यवसायाला पूरक असलेल्या सायझिंग उद्योगावर मोठे संकट आले आहे. शहरास रोजगार उपलब्ध करत देणाऱ्या उद्योगास सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून संरक्षण देण्यासाठी विशेष महासभा बोलावून धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती मालेगाव पॉवरलूम सायझिंग बचाव कमिटीचे संयोजक माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आझादनगर : मालेगाव शहर पूर्णत: वस्त्रोद्योगावर अवलंबून असणारे शहर आहे. मात्र यंत्रमाग व्यवसायाला पूरक असलेल्या सायझिंग उद्योगावर मोठे संकट आले आहे. शहरास रोजगार उपलब्ध करत देणाऱ्या उद्योगास सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून संरक्षण देण्यासाठी विशेष महासभा बोलावून धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती मालेगाव पॉवरलूम सायझिंग बचाव कमिटीचे संयोजक माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.  मुफ्ती मोहंमद इस्माईल पुढे म्हणाले की, राज्यात यंत्रमागाचे शहर म्हणून मालेगाव शहराचा नावलौकिक आहे. देशात शेतीपश्चात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय वस्त्रोद्योग आहे; मात्र काही दिवसांपासून वायुप्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण मंडळाद्वारे व सध्या मनपा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १२५ सायझिंगवर संक्रांत आल्यास संपूर्ण यंत्रमाग व्यवसाय ठप्प होईल व मजुरांवर उपासमारीची वेळ येईल म्हणून याकडे सहानुभूतीपूर्वक पाहता त्यांना संरक्षण देण्यासाठी मनपाने विशेष महासभा बोलवून निर्णय घेणे गरजेचे आहे.  मालेगाव पॉवरलूम सायझिंग बचाव कमिटीचे संयोजक तथा महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल म्हणाले की, सायझिंग उद्योगावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ आठ दिवस असोसिएशन बंद पाळला. त्यामुळे संपूर्ण यंत्रमाग व्यवसाय ठप्प झाले होते.  यावेळी नगरसेवक एजाज बेग, अतिक कमाल, तनवीर अहमद जुल्फेकार, हनीफ साबीर, नगरसेवक अमानतुल्ला पीर मोहंमद, जुल्फेखार अहमद, मो. अब्दुल्ला मो. इस्माईल यांच्यासह कमिटीचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.सायझिंग असोसिएशनची बैठकसायझिंग असोसिएशनच्या बैठकीत प्रदूषण निर्माण करणाºया पदार्थ वापरण्याच्या विरोधात निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तथापि प्रदूषणाच्या नामोल्लेखाली सुरू झालेली कारवाई परवानगी व ना हरकतच्या नावाखाली मनपाकडे वळण घेतले आहे. अशा परिस्थितीत मनपाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला नाही तर शहराचा मुख्य उद्योग संपुष्टात येईल म्हणून सद्यस्थितीतील एम.आर.टी.पी. नवीन संशोधन अधिनियमाप्रमाणे सर्व सायझिंग युनिटला सामावून घेत मनपाने कायदेशीर संरक्षण द्यावे यासाठी विशेष महासभा बोलवण्यासाठी मनपाला पत्र दिले आहे.

टॅग्स :Malegaonमालेगांव