शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तृषार्त वन्यजीव पाण्याच्या शोधात!

By admin | Updated: February 8, 2017 23:10 IST

व्यथा : हरीण, माकडांची नागरी वस्तीपर्यंत धाव

 खामखेडा : चालू वर्षी वर्षी जरी मोठ्या प्रमाणात डोंगरावर पाऊस झाला असला तरी जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यात असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदि हिंस्त्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या मळ्यामधील शिवारात येऊ लागले आहेत.खामखेडा गावच्या उत्तरेकडे भागामध्ये सावकी शिवार ते कळवण तालुक्यातील मोकभनगीपर्यंत डोंगराच्या पर्वतरांगा आहेत. या डोंगराच्या पर्वतरागांमध्ये तिळवण किल्ला आहे. त्या किल्ल्याजवळ खामखेडा गावाचे बुटीचे रान आहे. या रानात बुटीची विहीर राजेशाही काळात पाण्यासाठी प्रसिद्ध होती. या विहिरीला खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. या विहिरीत यापूर्वी भरपूर पाणी राहत असे. उन्हाळ्यात त्यामुळे या पाण्यावर वन्यप्राण्यांची तहान भागत असे. परंतु या विहिरीचे कठडे विहिरीत ढासळल्याने विहीर दगड व मातीने भरून आल्याने उन्हाळ्यात पाणी राहत नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ज्या प्रमाणात जंगलतोड झाली त्या प्रमाणात नवीन वृक्षांची लागवड केली गेली नाही. आणि जी काही प्रमाणात वृक्ष लागवड झाली, त्याची पाण्याअभावी किंवा देखभालीअभावी जतन झाली नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-कमी होत गेल्याने पाण्याची पातळी खोल गेल्याने डोंगरात साधारण डिसेंबर नंतर डोंगरात वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसते. या जंगलामध्ये पावसाळ्यातील डोंगर उतारावरील पाणी साचून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने हे पाणी पावसाळ्यात वाहून जाते. या पर्वतरांगांमध्ये बिबट्याचे प्रभाव क्षेत्र आहे. आता डोंगर-दऱ्यांमधील पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने डोंगरांमध्ये पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात डोंगर पायथ्याजवळील मळ्यातील वस्तीवर रात्रीच्या वेळेस येत आसल्याचे चित्र दिसून येत आहे. वनविभागाने या वन्यप्राण्यांसाठी डोंगरांमध्ये कोणत्याही प्रकारची पाण्यासाठी वनतळे तयार केली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे वन्यप्राणी अंधार परिसरात भक्ष्य व पाण्याच्या शोधात फिरतात व सकाळी उजाडण्यापूर्वी पुन्हा डोंगराच्या कडेकपारीत विश्रांतीसाठी निघून जातात. (वार्ताहर )