शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
4
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
5
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
6
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
7
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
8
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
9
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
10
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
11
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
12
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
13
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
14
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
15
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
16
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
17
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
18
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
19
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
20
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?

स्मार्ट फोनद्वारे शोधा नावासह मतदान केंद्र : संगणकीय कार्यप्रणाली

By admin | Updated: February 18, 2017 21:10 IST

महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला मतदान घेण्यात येणार असून, मतदारांना आपल्या नावासह मतदान केंद्र तातडीने शोधता यावे,

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला मतदान घेण्यात येणार असून, मतदारांना आपल्या नावासह मतदान केंद्र तातडीने शोधता यावे, याकरिता महापालिकेने संगणकीय कार्यप्रणाली विकसित करत त्यावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदारांना संगणक अथवा स्मार्ट फोनद्वारे नावासह मतदान केंद्र शोधणे सुलभ होणार आहे.महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रनिहाय मतदार यादी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तथापी सदर मतदार यादी ही पी.डी.एफ. फॉर्मेटमध्ये असल्याने यादीतून मतदारांना आपले नाव व मतदान केंद्र शोधणे सोयीचे व्हावे, याकरिता सर्व ३१ प्रभागांची यादी संकेतस्थळावर शोधणेसाठी आॅनलाइन सर्च सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मतदारांना संगणकावर किंवा स्मार्ट फोनद्वारे आपले नाव व मतदान केंद्र शोधणे सुलभ होणार आहे. नाशिक महापालिकेच्या ‘स्मार्ट नाशिक’ या मोबाइल अ‍ॅपवरदेखील सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरिता मतदारांनी गूगल प्ले स्टोअरवरून स्मार्ट नाशिक अ‍ॅप डाऊनलोड करणे अथवा अपडेट करणे आवश्यक आहे. या कार्यप्रणालीद्वारे मतदारांना आपल्या नावातील काही आद्याक्षरे वापरून किंवा मतदान ओळखपत्र क्रमांक वापरून तत्काळ आपले नाव मतदान यादीतून शोधता येणार आहे. मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रात आहे, याचीदेखील या कार्यप्रणालीद्वारे माहिती मिळणार आहे.