शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे यांच्या मारेकºयांचा शोध घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:24 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्त्येचा जलदगतीने तपास करून दोषींना अटक करावी, अशी मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली. भाकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एकत्र येऊन घोषणाबाजी करत पानसरे यांच्या खुनाचा निषेध नोंदविला

नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्त्येचा जलदगतीने तपास करून दोषींना अटक करावी, अशी मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली. भाकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एकत्र येऊन घोषणाबाजी करत पानसरे यांच्या खुनाचा निषेध नोंदविला  पानसरे यांच्या खुनाच्या घटनेला तीन वर्षे उलटूनदेखील अद्याप त्यांच्या मारेकºयांना अटक करून कायदेशीर शिक्षा देण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरत आहे. ज्या संशयितांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले त्यांनाही जामीन मिळाला असून ते मुक्त फिरत आहे. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकºयांनाही बेड्या ठोकण्यास हे सरकार अपयशी ठरल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.सरकारी तपासी यंत्रणेने त्वरित दाभोलकर, पानसरे यांच्या मारेक ºयांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन भाकपच्या वतीने छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा सचिव कॉमे्रड दत्तू तुपे, सचिव भास्करराव शिंदे, महादेव खुडे, राजू देसले आदिंच्या स्वाक्षºया आहेत. एकूणच पुरोगामी विचारवंतांचा महाराष्टÑासारख्या राज्यात खून होऊन तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून जातो. मात्र तरीदेखील आरोपींचा शोध तपासी यंत्रणेला लागत नाही, याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. सरकारकडून राज्यात दडपशाही राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.