शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे येथील रेशन दुकान सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:16 IST

एकलहरे : लॉकडाउन काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मुबलक धान्य उपलब्ध करून दिले असताना प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत ते पोहोचतच नसल्याचे उघड झाले आहे.

एकलहरे : लॉकडाउन काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मुबलक धान्य उपलब्ध करून दिले असताना प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत ते पोहोचतच नसल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने दिलेले वृत्त आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार सरोज आहिरे यांनी दुकानदाराला जाब विचारला. तथापि, त्याने माहिती न देता टाळाटाळ केली आणि दुरुत्तरेही दिल्याने अखेरीस पुरवठा विभागाने दुकान सील केले.नाशिक तालुका पूर्व भागातील काही रेशन दुकानदार रेशन नाकारून काळाबाजार करतात, अशा आशयाच्या तक्र ारी येत होत्या. ग्रामस्थ सरपंच मोहिनी जाधव यांच्याकडेही वारंवार तक्र ार करत होते. त्यानुसार तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच रेशन दुकानदारांचा सर्व्हे करून १७ एप्रिल रोजी लोकमतमध्ये नागरिकांची व्यथा मांडली होती. सरपंच मोहिनी जाधव यांनी रेशन विभागाची आॅनलाइन लिंक प्रसारित करून रेशनबद्दल जनजागृती मोहीम राबवली होती. त्यामध्ये ग्रामस्थांना मंजूर असलेल्या व रेशन दुकानदार वाटप करत असलेल्या रेशन धान्यात खूप मोठी तफावत आढळून आली, त्यामुळे त्यांनी देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्याकडे तक्र ार केली. आमदार आहिरे यांनी स्वत: रेशन दुकानाला भेट देऊन दुकानचालकाकडे त्यांनी स्टॉक रजिस्टर मागितले असता ते देण्यास टाळाटाळ करून दुरु त्तरे दिली. आमदार आहिरे यांनी पुरवठा निरीक्षक एस. पी. थोरात यांच्याशी संपर्क साधून सदर प्रकरणात तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पुरवठा निरीक्षक एस. पी. थोरात यांनी आय. बी. बियाणी यांच्या रेशन दुकान नंबर पाचची झाडाझडती घेतली असता तेथील कर्मचारी नियमबाह्य काम करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली असता प्रत्येक महिन्याला १० ते १५ किलो कमी रेशन मिळालेल्या व साखर तर वाटप न केलेल्या ग्रामस्थांचे जबाब घेतले व पुढील कार्यवाहीचे आदेश येईपर्यंत दुकानाला कुलूप लावण्यात आले.याप्रसंगी राजाराम धनवटे, सागर जाधव, उपसरपंच अशोक पवळे, ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, शानू निकम, भिकन मोरे, विठ्ठल पवार, किरण देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक