शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

चयल खुनातील संशयितांच्या मोक्कावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:15 IST

उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षी चयल यास टोळीने ठार मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयितांविरुध्द पोलिसांनी खुनाचा ...

उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षी चयल यास टोळीने ठार मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयितांविरुध्द पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या वेळी चयल याचा मित्र सुरज बद्रीनारायण कहाणे यास संशयित हल्लेखोरांनी चाकूचा धाक दाखवून त्याची ॲक्टिव्हा दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत पलायन केले होते. उपनगर पोलिसांसह गुन्हेशाखा युनिट २ व मध्यवर्ती गुन्हेशाखा यांच्या पथकांनी समांतर तपास करत गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सागर सुरेश म्हस्के ऊर्फ सोनू पाईकराव (२२) याच्यासह एकूण ११ संशयितांना अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासात संघटितप्रकारे गुन्हेगारांची टोळी सक्रिय असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. दरम्यान, उर्वरित ११ साथीदारांच्या दुसऱ्या टोळीच्याही मुसक्या बांधल्या. या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुध्द पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मोक्काअन्वये कारवाई करत सहायक आयुक्त समीर शेख यांच्याकडे तपास सोपविला. गुन्ह्यातील २२ संशयितांच्या टोळीचा मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव पाण्डेय यांनी तयार करून अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. याबाबत त्यांनी चौकशी करत या प्रस्तावास मंजुरी देत मोक्का कायद्यान्वये विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.

-----इन्फो---

यांच्यावर चालणार ‘मोक्का’नुसार खटला

मुख्य सूत्रधार व टोळीप्रमुख सागर सुरेश म्हस्के ऊर्फ सोनू पाईकराव याच्यासह रोहित सुरेश लोंढे ऊर्फ भुऱ्या, जय ऊर्फ वाल्मीक घोरपडे, राहुल भारत तेलोरे, कलाम सलिम राईन, सत्तू भैरू राजपूत, हर्ष सुरेश म्हस्के, जॉन चलन पडेची, योगेश श्रावण बोडके, साहील सुरेश म्हस्के, अमन हिरालाल वर्मा, अक्षय राजेंद्र पारचे, बाबू मनियार ऊर्फ संदीप सुंदरलाल, शिबन शफी शेख, अनुज हरबिर बेहनवाल, गोलू जेसुला बाबू, आतिश वामन तायडे, बॉबी ऊर्फ हर्ष किशोर बाबू, अजय राजेंद्र लोहट यांच्यासह तीन विधिसंघर्षित बालकांवर आता मोक्कानुसार खटला चालणार आहे.