शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

शहरातील पाच धान्य दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

नाशिक : कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेंतर्गत सध्या रेशनकार्डधारकांना मोफत धान्याचा पुरवठा केला जात असून, वितरणाची ...

नाशिक : कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेंतर्गत सध्या रेशनकार्डधारकांना मोफत धान्याचा पुरवठा केला जात असून, वितरणाची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदारांवर देण्यात आलेली आहे. मात्र काही दुकानदारांविरुद्ध नियमबाह्य कामकाज होत असल्याच्या तक्रारी आल्याने पुरवठा विभागाने केलेल्या तपासणीत दोषी आढळून आलेल्या शहरातील पाच दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे.

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू असून, १५ जूनपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. या कालावधीत रोजगाराअभावी अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा प्रसंगी त्यांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून एप्रिल आणि मे, तर केंद्र शासनाच्या गरीब कल्याण याेजनेंतर्गत मे तसेच जूनमध्ये मेाफत धान्य वितरण केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन दुकानदारांचा अंगठा करून ई-पॉस मशीनवर धान्य वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रकारात मोठा घोळ झाल्याच्या तक्रारी आल्याने शहरातील पाच दुकानदारांची तपासणी धान्य वितरण अधिकाऱ्यांकडून करण्यात आली असता त्यात गंभीर त्रुटी आढळल्याने पाच दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

मोफत धान्य वितरणासाठी दुकाने सुरू ठेवण्यासाठी दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली होती, असे असतानाही काही दुकानदारांच्या ई-पॉस मशीनवर दुपारनंतर धान्य वितरण झाल्याची नोंद आढळून आली, तर काही दुकाने सायंकाळीदेखील शटर बंद करून सुरू होती, अशीदेखील बाब तपासणीत पुढे आली आहे. दुकानदारांचा अंगठा ग्राह्य धरण्यात आल्यामुळे पात्र कार्डधारकांना पावतीप्रमाणे धान्य उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना अनेकांना धान्याचा पुरेसा पुरवठादेखील करण्यात आला नसल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार धान्य वितरण अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असता सिडको भागातील तीन, तर शहरातील अन्य दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

--कोट--

शहरात धान्य वितरण अधिकारी यांनी एकूण पाच दुकाने सील केलेली आहेत. आलेल्या तक्रारींची दखल घेत संबंधित दुकानांची तपासणी करण्यात येऊन कारवाई करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात तक्रारींसाठी स्वतंत्रपणे नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ग्रामस्तरीय दक्षता समितीसमोर धान्य वाटपाबाबत सूचित करण्यात आलेले आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाई केली जात आहे.

- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी