शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बाजार ठरणार तारक की मारक

By admin | Updated: February 12, 2017 23:00 IST

परप्रांतीय, अल्पसंख्याकांच्या मतांवर डोळा

नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोपरप्रांतीयांच्या ताब्यात असलेला बहुचर्चित भंगार बाजार हटविण्यासाठी सेनेने केलेल्या प्रयत्नांमुळे दुखावलेले अल्पसंख्याक व याच मतांवर डोळा ठेवून असलेल्या माकपा या दोन्ही पक्षांची प्रभाग क्रमांक २६ मध्ये सरळ सरळ लढत होत आहे. त्यामुळे भंगार बाजार कोणाला तारतो आणि कोणाला मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सिडको व सातपूरच्या काही भागाचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक २६ हा सध्याचा ४९ व ५० प्रभाग मिळून तयार झाला आहे. प्रभागातील ‘अ’ या सर्वसाधारण गटात माकपाकडून विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे, सेनेकडून माजी नगरसेवक दिलीप दातीर, भाजपाचे उखा चौधरी, कॉँग्रेसकडून विठ्ठल विभुते, धर्मराज्य पक्षाकडून अनंत लोहार, राष्ट्रीय समाज पक्षाकडून संजय गुंजाळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वरकरणी माकपा, सेना, कॉँग्रेस असे तीन पक्षात खरी लढत दिसली तरी, तरी, भंगार बाजार हा एकमेव प्रचारात कळीचा मुद्दा आहे. परंतु हा बाजार उद््ध्वस्त झाल्याने हजारो कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जाणार आहे. परप्रांतीयांची एकूण संख्या पाहता तेच या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. ‘ब’ या सर्वसाधारण महिला गटातून माकपाच्या अ‍ॅड. वसुधा कराड, भाजपाकडून डॉ. ज्योती सोनवणे, शिवसेनेच्या हर्षदा गायकवाड, मनसेकडून कामिनी दोंदे, धर्मराज्य पक्षाकडून निर्मला पवार व अपक्ष म्हणून मनोरमा श्रीवास्तव निवडणूक रिंगणात आहेत. वसुधा कराड यांनी यापूर्वी या भागाचे प्रतिनिधित्व केलेले असून, या गटात माकपाविरुद्ध सेना, भाजपा असे चित्र असेल. भाजपाच्या डॉ. सोनवणे यांनी गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या वतीने निवडणूक लढविली होती, यंदा त्या भाजपाकडून रिंगणात आहेत. ‘क’ या सर्वसाधारण महिला गटातून भाजपाने माजी नगरसेवक अलका अहिरे यांना उमेदवारी दिली आहे. माकपाकडून रेखा खैरनार, शिवसेनेच्या भारती कुशारे, राष्ट्रवादीकडून आश्लेषा पाटील, मनसेकडून लता गोवर्धने, धर्मराज्य पक्षाकडून संगीता अहिरे यांनीही रिंगणात उडी घेतली आहे. अलका अहिरे सोडल्या तर सारेच उमेदवार नवखे असून, या गटात भाजपाविरूद्ध सारे पक्ष अशीच लढत रंगणार आहे. ‘ड’ सर्वसाधारण खुल्या गटातून शिवसेनेचे भागवत आरोटे, भाजपाकडून निवृत्ती इंगोले, मनसेकडून ज्ञानेश्वर बगाडे, राष्ट्रवादीकडून सद्दाम हुसेन अली शेख, राष्ट्रीय समाज पक्षाकडून शमसाद अली मोहम्मद खान, भारिप बहुजन महासंघाचे संतोष वर्मा, अपक्ष सुधाकर जादव, मधुकर जाधव हे आमने-सामने आहेत. सेनेचे भागवत आरोटे हे भंगार बाजार विरोधी कृती समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचार भंगार बाजार भोवती फिरणार हे स्पष्ट आहे. या गटात सर्वच नवखे उमेदवार असल्यामुळे निश्चित अंदाज बांधता येत नसला तरी सेना, भाजपा व मनसे यांच्यातच ही खरी लढत आहे.