शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

भंगार बाजार व्यावसायिक : मिनी कमर्शिअल झोनची मागणीमनपावर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:56 IST

सातपूर-अंबड लिंकरोडवरील हटवण्यात आलेल्या भंगार बाजार व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासह परिसरात मिनी कमर्शिल झोन लागू करण्यासाठी नाशिक शहर अल्पसंख्याक कॉँग्रेस आणि युवक कॉँग्रेसच्या वतीने भंगार बाजार व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला.

ठळक मुद्देबी. डी. भालेकर हायस्कूलपासून सुरुवात मोर्चात महापालिका प्रशासनाविरुद्ध घोषणाफलकही लक्ष वेधून घेत होते

नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील हटवण्यात आलेल्या भंगार बाजार व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासह परिसरात मिनी कमर्शिल झोन लागू करण्यासाठी नाशिक शहर अल्पसंख्याक कॉँग्रेस आणि युवक कॉँग्रेसच्या वतीने भंगार बाजार व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला.बी. डी. भालेकर हायस्कूलपासून भंगार बाजार व्यावसायिकांच्या मोर्चाला सुरुवात झाली. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, अल्पसंख्याक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शेख हनिफ बशीर आणि युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा महापालिकेवर नेण्यात आला. मोर्चात महापालिका प्रशासनाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. याशिवाय, व्यावसायिकांच्या हातात ‘भिक नको हक्क हवा, अन्याय नको न्याय हवा’, ‘मिनी कमर्शिअल झोन झालाच पाहिजे’, ‘पर्यायी जागा मिळालीच पाहिजे’, असे फलकही लक्ष वेधून घेत होते. यावेळी उद्ध्वस्त झालेल्या व्यवसायाच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा मिळावी, सातपूर-अंबड लिंकरोड येथे मिनी कमर्शिअल झोन लागू करावा, लिंकरोडवर व्यापाºयांना स्वत:च्या मालकी हक्काच्या जागेवर मिनी स्क्रॅप मार्केटला मान्यता द्यावी आणि मालकी हक्काच्या जागेवर व्यवसाय करण्यासाठी शेड उभारण्यास परवानगी द्यावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी भंगार बाजार व्यावसायिकांनी प्रशासनाने केलेल्या कारवाईचा निषेधही केला. या आंदोलनात नगरसेवक वत्सला खैरे, आशा तडवी तसेच कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांचेसह भंगार बाजार व्यावसायिक सहभागी झाले होते.