शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

स्कॉर्पिओच्या धडकेत कामगार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:22 IST

ओझर येथील कंपनीतून रात्री कामाहून घराकडे परतताना आडगाव शिवारातील मेडिकल फाट्यावर भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. बुधवारी (दि.६) रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पंचवटी : ओझर येथील कंपनीतून रात्री कामाहून घराकडे परतताना आडगाव शिवारातील मेडिकल फाट्यावर भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. बुधवारी (दि.६) रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.रुपेश सुभाष भावसार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते कलानगर, म्हाडा कॉलनीतील रहिवासी होते. ते ओझर येथील डीटीएल कंपनीत कामाला होते. बुधवारी रात्री ते सुटी झाल्याने स्प्लेंडरवरून ( एमएच १५, सीएक्स ३२०९) आडगाव मेडिकल फाटा रस्त्याने दिंडोरीरोडकडे जात असताना भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ (एमएच १५, बीएन ८५९५) या वाहनाने जबर धडक दिली. या धडकेने भावसार हे रस्त्यावर फेकले गेले. त्यात त्यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर स्कॉर्पिओ वाहनाच्या चालकाने वाहन सोडून पलायन केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव फाटा, के. के. वाघ तसेच जत्रा चौक येथे वर्दळ वाढल्याने रस्ता ओलांडणाºयांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महामार्गावरील अनेक चौक धोकेदायक बनल्याने अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचे बोलले जात आहे.