शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रोक्त पद्धतीने शेतीचा जलद विकास

By admin | Updated: January 26, 2017 00:31 IST

श्रीपाद नाईक : जागतिक कृषी महोत्सव उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीला बदलत्या हवामानाचा आणि ऋतुचक्राचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असून, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही दशकांत नापिकीसह दुष्काळ, अवकाळी, पूर यांसह विविध समस्यांना शेतकऱ्यांना समोर जावे लागले आहे.   या संकटातून सुटका करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याची गरज असून, कृषी महोत्सव व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीची शास्त्रोक्त पद्धत पोहोचत असल्याने शेतीचा जलद गतीने विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, प्रधान केंद्र दिंडोरी आणि कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बुधपारी (दि. २५) कृषी महोत्सवाचे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी नाईक बोलत होते. व्यासीपठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, मौलवी इतिहाक अहमद, अलिम शेख, स्थायी समिती सभापती सलीम शेख, चंद्रकांत मोरे आदि उपस्थित होते.  उद्घाटन सोहळ्यापूर्वी रामकुंड ते डोंगरे वसतिगृह मैदानापर्यंत कृषी दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी भारतीय शेतकऱ्यांसमोर आव्हानांचा डोंगर आहे; मात्र ते आव्हान पेलण्याची शक्ती येथील संथ परंपरेने दिलेल्या कृषी संस्कृतीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बी-बियाणे, खते, कृषी मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन उत्पादनात वाढ करण्याची गरज असल्याचेही  ते म्हणाले. तर इस्राईलच्या धरतीवर भारतीय शेती उद्योगाचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.  शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत विविध सेवाभावी संस्थानी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. (प्रतिनिधी)