तरसाळी : शिक्षकाच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात तरसाळी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला चालू शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुलूप लावले होते. ‘विद्यार्थ्यांना वऱ्हांड्यातच बसावे लागते’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी तरसाळी शाळेला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी दुसऱ्या शिक्षकाच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी शाळेचे कुलूप उघडले. गटविकास अधिकारी, गटशिक्षणधिकारी यांनी हे आश्वासन पूर्ण करून तरसाळी शाळेत देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम आणि गटशिक्षणधिकारी पी. आर. जाधव यांनी शिक्षकाची बदली झाली असली तरी शाळेच्या दर्जावर व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही.तसेच मागणीनुसार दुसऱ्या शिक्षकाच्या नियुक्तीचे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर शाळेचे कुलूप उघडले गेले. या नवीन नियुक्ती केलेल्या शिक्षकामुळे दोन शिक्षकांवरचा अध्यापनाचा भार कमी होऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देता येणार आहे. त्यामुळे साहजिकच शाळेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. नवीन शिक्षकाची नियुक्ती झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)
शाळेला मिळाला शिक्षक
By admin | Updated: August 14, 2016 22:30 IST