शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव लालफितीतच

By admin | Updated: September 13, 2016 01:15 IST

सदस्याची नाराजी : ८९ शाळा खोल्यांचे निर्लेखन कागदावरच

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ३३८० प्राथमिक शाळांमधील ८९ शाळा खोल्यांच्या निर्लेखनाचे २९ प्रस्ताव कागदावरच असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. विशेष म्हणजे निर्लेखनच झालेले नसल्याने या शाळा कधीही कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे.सोमवारी (दि.१२) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना बोलावून या ८९ शाळा खोल्यांच्या २९ प्रस्तावांना नेमका अडसर कोणत्या विभागाचा आहे? अशी विचारणा केली. त्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच बांधकाम विभागाचा याला अडसर असल्याचे संबंधित काम पाहणारे कर्मचारी राजेश आहेर यांनी सांगितले. जिल्हाभरातून ओझर, अंदरसूल, दारणा सांगवीसह जिल्ह्णातील २८ शाळांमधील सुमारे ८९ शाळांच्या खोल्या निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर नसल्याची बाब उघड झाली. यावेळी शिक्षण समिती सदस्य प्रा. प्रवीण गायकवाड यांनी मागील सर्वसाधारण सभेतच आपण सर्व शाळा खोल्या निर्लेखनांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा ठराव आयत्यावेळी मांडलेला असल्याने त्यानुसार या ८९ शाळा खोल्यांच्या कामांना अद्याप निर्लेखित का केले नाही, अशी विचारणा केली. त्याचवेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी या शाळा खोल्या निर्लेखित करण्यासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी बाकी असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे आता पावसाळा उलटत आला तरी या गळक्या व पडक्या शाळा खोल्यांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव दोन विभागांच्या साठमारीत पडून असल्याचे चित्र आहे. याबाबत तत्काळ आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांना बोलावून बांधकाम विभागाचा अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. येत्या काही दिवसांत शाळा खोल्या निर्लेखनाची कार्यवाही मार्गी लागेल, असे अनिल लांडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)