शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या संरक्षक भिंतीचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:49 IST

नाशिक : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या असंख्य शाळांना संरक्षक भिंती नसल्यामुळे अशा शाळेला बाह्ण घटकांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र जिल्हा परिषदेकडे शाळांच्या संरक्षण भिंतीसाठी स्वतंत्र अशी तरतूदच नसल्याने त्याचा भार आमदार निधीवर येत असल्याने संरक्षण भिंतीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्याची मागणी आमदार दीपिका चव्हाण यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देआमदार निधीवरस्वतंत्र लेखाशीर्ष हवे : दीपिका चव्हाण यांची मंत्र्यांकडे मागणी

नाशिक : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या असंख्य शाळांना संरक्षक भिंती नसल्यामुळे अशा शाळेला बाह्ण घटकांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र जिल्हा परिषदेकडे शाळांच्या संरक्षण भिंतीसाठी स्वतंत्र अशी तरतूदच नसल्याने त्याचा भार आमदार निधीवर येत असल्याने संरक्षण भिंतीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्याची मागणी आमदार दीपिका चव्हाण यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीसाठी आलेल्या मुनगंटीवार यांची आमदार चव्हाण यांनी भेट घेऊन त्यांचे या परिस्थितीकडे लक्ष वेधले. यावेळी मंत्रिमहोदयांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्णातील अनेक शाळांना संरक्षक भिंती नसल्यामुळे अशा शाळांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांकडून संरक्षण भिंतीची मागणी केली जाते. अनेकदा नागरिकांच्या आग्रहास्तव शाळा संरक्षक भिंतीचा खर्च आमदार निधीतून करावा लागतो. मुळातच आमदारांना मतदारसंघातील अनेक कामे असताना आमदार निधी पुरा पडत नाही. अशातच संरक्षण भिंतीसाठी देखील खर्च करावा लागतो.संरक्षक भिंती नसल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनादेखील अनेकदा त्रास सहन करावा लागतो. शाळा बंद झाल्यानंतर तर शाळा परिसराचा गैरवापर केला जात असल्याच्यादेखील तक्रारी आहेत. शिवाय अतिक्रमणाबरोचरच अवैध धंदे, गुंडाचे आश्रयस्थान, मद्यपींचा अड्डा अशी शाळांची परिस्थिती होते. याचमुळे शाळांच्या संरक्षण भिंतीचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये देखील वारंवार चर्चिला गेला आहे. परंतु या कामासाठी जिल्हा परिषदेचे लेखाशीर्षच नसल्यामुळे या कामावर जिल्हा परिषदेला खर्च करता येत नाही. याचा भार आमदार निधीवर येत असल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. आमदारांना मिळणाºया निधीतून मतदारसंघात कामे करताना निधी नियोजनाची तारेवरची कसरत त्यांना कारावी लागते. आमदार निधीतून लोकहितार्थ कामे प्राधान्याने करावी लागतात. त्याचसाठी आमदार निधी पुरेसा पडत नाही. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाºया शाळांच्या संरक्षण भिंतीचे काम हे जिल्हा परिषदेनेच करावे आणि त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध नसल्यामुळे या कामांसाठी तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या कामासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष असावे, अशी मागणी आमदार दीपिका चव्हाण यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केलेली आहे. अनेक शाळा असुरक्षितशाळांची सुरक्षितता हा विषय प्राधान्यक्रमावर घेतला जात नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही चांगलीच खडाजंगी झाली होती. सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत शाळांच्या संरक्षक भिंतीविषयी प्रश्न उपस्थितीत केलेले आहेत. शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने शाळांना संरक्षण भिंतीवर खर्च करण्याचा तसेच शाळा स्थलांतराचा मुद्दादेखील चर्चेला आला आहे. सदर प्रश्न सातत्याने उपस्थितीत होत असतानादेखील लेखाशीर्षबाबत जिल्हा परिषदेकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने आता आमदार चव्हाण यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.