शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलींनी घेतली रोपे दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

कोरोनामुळे शाळांना अघोषित सुटी जाहीर झाली. मागील चार महिन्यांपासून शाळांचे प्रवेशद्वार उघडलेले नाही. याकाळात शाळकरी मुले, मुली घरातच बसून ...

कोरोनामुळे शाळांना अघोषित सुटी जाहीर झाली. मागील चार महिन्यांपासून शाळांचे प्रवेशद्वार उघडलेले नाही. याकाळात शाळकरी मुले, मुली घरातच बसून ऑनलाइन धडे गिरवत आहेत. नवरंग कॉलनीमध्ये राहणाऱ्या अशाच काही शाळकरी मुलींना मागील महिन्यात आपल्या परिसरातील मोकळ्या भूखंडांवरील कोमजणाऱ्या रोपांना बघून त्यांच्या संवर्धनाची कल्पना सुचली. या सर्व चिमुकल्या मैत्रिणींनी एकत्र येत या भूखंडावरील लहान झाडांना प्रतीकात्मक स्वरुपात आपापली नावे दिली आणि प्रत्येकीने एक झाड दत्तक घेत त्याच्या संवर्धनाचा संकल्प सोडला अन‌् मग सुरु झाला सकाळ-संध्याकाळ झाडांना पाणी देत निगा राखण्याचा नित्यक्रम.

येथील मनपाच्या मोकळ्या भूखंडावर काही महिन्यांपूर्वी मनपाच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने ‘देवराई’ उपक्रमांतर्गत २०० रोपांची लागवड केली आहे. लोकसहभागातून या संस्थेकडून रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. याच भागात राहणाऱ्या ईच्छामणी दर्शन सोसायटीमधील विविध कुटुंबातील शाळकरी मैत्रिणींनी एकत्र येत वृक्ष संवर्धनाचा वसा उचलला. त्यासाठी त्यांनी थेट येथील रोपे दत्तकच घेऊन टाकली. ‘आपले झाड आपणच वाढवायचे’ असा निश्चय या चिमुकलींनी केला आहे.

---इन्फो-- ...असा आहे वृक्षप्रेमी मुलींचा ग्रुप यज्ञजा गवळी, शौर्या केदार, आराध्या पुंडे, अनन्या, स्पृहा जैन, आर्या यांच्यासह अन्य शाळकरी मुलींनी एकत्र येत आपला ग्रुप तयार केला आहे. या मुलींनी आपली नावे येथील झाडांना देऊन त्यांच्या जगविण्यासाठी धडपड सुरु केली आहे. एरवी वृक्षारोपण करण्यासाठी अनेक हात पुढे येतात मात्र एकदा झाड लावल्यानंतर ते जगले की नाही, हे तपासण्याची तसदी अपवादानेच बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडून घेतली जाते. त्यामुळे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य जनप्रबोधनासाठी अस्तित्वात आले. भावी पिढी झाडे लावण्यासोबतच ती जगविण्याबाबतही सजग असल्याचे या मुलींच्या ग्रुपने दाखवून दिले आहे.