शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

लोकसहभागातून शाळा डिजिटल

By admin | Updated: August 20, 2016 00:38 IST

शिक्षक झाले हायटेक : संगणक, प्रोजेक्टर, ई-लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना धडे

येवला : खापराची पाटी, पेन्सिलने त्यावर केलेला गृहपाठ आणि केलेला गृहपाठ शिक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवा, पुसू नये म्हणून हातात पाटी धरून अनवाणी शाळेला निघालेला विद्यार्थी, पाठीवर खताच्या गोणीपासून बनवलेल्या पिशवीमध्ये जुन्या वापरलेल्या पुस्तकांचा संच असे चित्र अगदी अलीकडेही गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून दिसत होते...इंटरनॅशनल इंग्रजी शाळांचे खूळ खेडोपाडी पसरायला लागल्यापासून गावागावांमध्ये ‘आहे रे आणि नाही रे’ असा नवीन डिजिटल वर्ग विग्रह तयार होत आहे. त्यातून सरकारी शाळांमधून शिकवणाऱ्या शिक्षकांना मर्यादित साधन सुविधेमुळे मर्यादा येऊन मरगळ तसेच न्यूनगंड निर्माण होत आहे. मात्र याही परिस्थितीवर मात करून आपल्या शाळेचा दर्जा, ज्ञानदान पद्धती यात सुधारणा करून आधुनिक साधने लोकसहभागातून आपली शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न गावाने केला आहे. त्याला गावातील नागरिकांनी आणि शिक्षकांनी आपले योगदान देऊन शाळेला अद्ययावत संगणक यंत्रणा उभारण्यात येत आहे. यासाठी रहाडी गावच्या भूमिपुत्र असलेले भागवत सोनवणे यांनी उच्च क्षमतेचा संगणक, प्रोजेक्टर देऊन सुरुवात केली आहे. एका कार्यक्र मात एक संगणक आणि प्रोजेक्टर असे एकूण ५१ हजार रुपयांचे साहित्य रहाडी जिल्हा परिषद शाळेला भेट म्हणून दिले. त्यातून प्रेरणा घेऊन आधीच शाळेवर प्रेम करणारे मूळचे आंबेजोगाई येथील शिक्षक मुख्याध्यापक अमोल मुके यांनी आपल्या पगारातून पाच हजार रु पये डिजिटल शाळेसाठी देण्याचे घोषित केले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मूळचे चंद्रपूर येथील शिक्षक प्रकाश हरणे यांनी पाच हजार रुपये दिले. मूळचे औरंगाबाद येथील शिक्षक चंद्रशेखर खडांगळे यांनी पाच हजार तर स्थानिक शिक्षक रामदास भोंगाळ यांनी पाच हजार रु पये दिले.विदर्भ-मराठवाडा येथून नोकरीनिमित्त आलेल्या शिक्षकांचे योगदान बघून मागे राहतील ते गावकरी कसले. कोणी १००, कोणी दोनशे तर कोणी ५०० असे एकूण १७ हजार रुपये तासाभरात जमा झाले. जमा झालेल्या पैशातून आणखी तीन संगणक येत्या दोन दिवसात खरेदी करण्यात येत आहे. रहाडी येथील गणेशवाडी येथील वस्ती शाळेला ही एक संगणक देण्यात येणार आहे. यावेळी सरपंच अंजनाबाई सोनवणे, उपसरपंच सोनुपंत भोंगळ, सुलतान शेख, दादाभाऊ गायकवाड, जेमादार पठाण, केशरबाई रोकडे, जुबेदाबी शेख, गीता महाजन सदस्य, शांताबाई मोरे हे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक चेतन बोद्रे, यासह बाबूभाई शेख, आजिम शेख, श्रवण मोरे, बाबासाहेब गायकवाड, सखाहरी गायकवाड, दत्तू सोनवणे, देवीदास गायकवाड, सुदाम रोकडे, गोरखनाथ महाजन, उत्तम रोकडे, नितीन गायकवाड, जगन पवार, संजय राऊत, मुख्याध्यपक मुके आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)